Join us

‘हॅप्पी दिवाली’साठी टीम इंडिया सज्ज, पाकिस्तानविरोधात आज महामुकाबला

मेलबोर्न मैदानावर वेळेनुसार दुपारी १.३० पासून खेळल्या जाणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 08:39 IST

Open in App

मेलबोर्न : कधीही हार न मानणाऱ्या टीम इंडियाला वर्षभराआधी दुबईत टी-२० विश्वचषकात पराभवाचा धक्का बसला होता. पाकिस्तानविरुद्ध ‘त्या’ पराभवाची परतफेड करण्यास आणि  विजयाची ‘हॅप्पी दिवाळी’ करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ रविवारी उतरणार आहे. मेलबोर्न  मैदानावर वेळेनुसार दुपारी १.३० पासून खेळल्या जाणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट कायम आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस असला तरी सामना रद्द होण्याची शक्यता कमीच आहे. दोन्ही देशांचे चाहते या सामन्याच्या निमित्ताने येथे पोहोचले असून ९५ हजार क्षमता असलेल्या या मैदानावरील सर्व तिकीटे आधीच संपलेली आहेत. रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्या संघांसाठी हा नेहमीसारखा सामना असला तरी  चाहत्यांसाठी  ही लढत युद्धापेक्षा कमी असणार नाही. 

टॅग्स :भारतपाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App