Join us

IND vs SA: दुसऱ्या कसोटीसाठी संघातून कोणाचा होणार 'पत्ता कट'? 'या' २ खेळाडूंची नावं चर्चेत

- भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत झाला लाजिरवाणा पराभव- कसोटी मालिका वाचवण्याचे रोहित शर्माच्या टीमपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 12:24 IST

Open in App

IND vs SA 2nd Test Team India Probable Changes: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ३ जानेवारीपासून न्यूलँड्स येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडिया आफ्रिकेत पोहोचली तेव्हा मालिका जिंकणार असे त्यांचे स्वप्न होते. पण हे स्वप्न अधुरेच राहिले. कारण पहिल्या कसोटीतच टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. आता मालिकेतील दुसरी आणि वर्षातील पहिली कसोटी उद्यापासून सुरु होणार आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे होणार आहे. कर्णधार रोहित शर्माला मालिका बरोबरीत आणायची असेल तर त्यासाठी भारतीय संघ दोन मोठे बदल करू शकेल अशी चर्चा आहे.

टीम इंडिया करणार हे दोन बदल!

पहिला बदल म्हणजे प्रसिध कृष्णाला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो आणि त्याच्या जागी मुकेश कुमारला संधी मिळू शकते. रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यापूर्वी मुकेश कुमारसोबत बराच वेळ नेट्स मध्ये सराव केला आहे, त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच रवींद्र जडेजाच्या पुनरागमनाचा संघात आणखी एक बदल पाहायला मिळू शकेल. पहिल्या सामन्यापूर्वी जडेजाला काही समस्या होत्या, त्यामुळे तो खेळू शकला नाही. पण आता जडेजा तंदुरुस्त आहे, त्यामुळे तो प्लेइंग-11 मध्ये आला तर रविचंद्रन अश्विनला बाहेर बसावे लागेल.

दरम्यान, टीम इंडियाने न्यूलँड्सच्या मैदानावर आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले असून त्यापैकी २ सामने अनिर्णित राहिले आहेत तर ४ सामन्यांत भारतीय संघाचा पराभव झाला आहे.

असं असू शकेल भारताचं प्लेइंग-11:

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मारवींद्र जडेजाआर अश्विनद. आफ्रिका