Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL नंतर युजवेंद्र चहलनं केला नवा हेअरकट; चाहते म्हणाले, "५० रुपयांत तर यापेक्षा चांगला…"

युजवेंद्र चहलच्या फोटोवर त्याचे चाहते भन्नाट कमेंट्स करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 13:54 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीग (IPL) संपल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू थोडे आरामाच्या मूडमध्ये आहेत. काही खेळाडू फिरण्यात व्यस्त आहेत, तर काही त्यांच्या घरी वेळ घालवत आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने नवीन हेअरकट केलाय आणि आता त्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट अलीम हकीम यांच्याकडून युजवेंद्र चहलने हेअरकट केला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यावर मजेशीर कमेंट्सही केल्या. अलीम हकीम यांनी युजवेंद्र चहलचा फोटो शेअर केला आणि युजवेंद्र चहलसाठी फ्रेश हेअर समर कट असं कॅप्शनही दिलंय. गंमतीची बाब म्हणजे चहलच्या या हेअरकटवर चाहत्यांनी मजेदार कमेंट्स केल्या. काही चाहत्यांनी लिहिले की असे केस कापण्याचा काय उपयोग आहे कारण आंघोळ केल्यावर ते पूर्वीसारखे होतील. तर काहींनी कमेंटमध्ये लिहिले की, ५० रुपयांमध्ये गावात चांगलं कटिंग केली जाते.

अलीम हकीम हे मुंबईतील स्टार हेअर स्टायलिस्ट आहेत. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचा हेअरकट करताना ते यापूर्वी दिसले आहेत. याशिवाय एमएस धोनी, विराट कोहली, हार्दिक पांड्यासह अनेक क्रिकेटर्सही त्यांच्याकडे येतात.

टॅग्स :युजवेंद्र चहलभारतीय क्रिकेट संघ
Open in App