Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

Athiya Shetty-KL Rahul : लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी आई बाबा होणार आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 19:35 IST

Open in App

KL Rahul and Athiya Shetty : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू लोकेश राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी या जोडप्याच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. अथियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आई आणि राहुल बाबा होणार असल्याचे सांगितले. अथियाने ही खुशखबर देताच क्रिकेट वर्तुळासह चित्रपटसृष्टीतील मंडळी अथिया-राहुलचे अभिनंदन करत आहे. मागील काही दिवसांपासून अथियाच्या प्रेग्नंसीची चर्चा होती. आता स्वत: अथियानेच बातमीला दुजोरा देत जाहीर केले आहे. लग्नानंतर एका वर्षात अथियाने ही गुडन्यूज दिली. दोघांवर मित्रमंडळी आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा यांनीही अथियाचे अभिनंदन केले.

खरे तर अथिया शेट्टीच्या प्रेग्नंसीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र दोघांनी यावर काहीच भाष्य केले नव्हते. शुक्रवारी अथियाने चाहत्यांना सरप्राईज दिले. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावमर पोस्ट शेअर करत लिहिले की, आमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर आशीर्वाद लवकरच येत आहे... २०२५ या पोस्टसोबत तिने 'नजर न लागो' असा इमोजीही पोस्ट केला आहे.

सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टीने अथियाने दिलेले सरप्राईज पाहून बोलकी प्रतिक्रिया दिली. कमेंटच्या माध्यमातून तिने म्हटले की, अरे देवा... अभिनंदन.

दरम्यान, पुढील वर्षी अथिया शेट्टी बाळाला जन्म देणार आहे. सुनील शेट्टी आजोबा होणार असल्याने आनंदात आहेत. गेल्या वर्षी २३ जानेवारी रोजी अथिया आणि लोकेश राहुल यांनी लग्नगाठ बांधली. आता दोघेही आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात करत आहेत. लोकेश राहुल सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तो सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. 

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुलसूर्यकुमार अशोक यादवऑफ द फिल्ड