Join us

​Jasprit Bumrah Surgery​ : जसप्रीत बुमराहवर पार पडली शस्त्रक्रिया, वर्ल्ड कप २०२३ पूर्वी होणार का पूर्णपणे फिट?

Jasprit Bumrah Surgery​ : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या न्यूझीलंडमध्ये आहे आणि तेथे त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 10:43 IST

Open in App

​Jasprit Bumrah Surgery​ : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या न्यूझीलंडमध्ये आहे आणि तेथे त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. बुमराहच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून तो धोक्याबाहेर आहे. बुमराहची शस्त्रक्रिया क्राइस्टचर्चमधील डॉ. रोवन स्काउटेन यांनी केली आणि आता बुमराह कधी मैदानात परतणार याचीही माहिती समोर आली आहे. शस्त्रक्रियेनंतर बुमराहला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला नाही आणि तो पूर्णपणे बरा आहे. क्राइस्टचर्चमधील ऑर्थोपेडिक हॉस्पिटलच्या अधिकाऱ्याने मात्र बुमराहच्या प्रकृतीबाबत अपडेट देण्यास नकार दिला. याविषयी ते प्रथम बीसीसीआयला कळवतील, असे त्यांनी सांगितले.

जसप्रीत बुमराहची शस्त्रक्रिया न्यूझीलंडचे प्रसिद्ध डॉक्टर रोवन स्काउटेन यांनी केली आहे. रोवनने यापूर्वी ग्रॅहम इंग्लिससोबत काम केले होते. इंग्लिसने न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँडची कारकीर्द पाठीच्या दुखापतीतून वाचवली होती. अशाप्रकारे अनेक वर्षे इंग्लिशमध्ये काम करणाऱ्या अनुभवी रोवनने आता बुमराहवर क्राइस्टचर्चमध्ये उपचार केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच आणि न्यूझीलंडचा माजी खेळाडू शेन बाँड यांनी त्याला न्यूझीलंडला जाण्याचा सल्ला दिला होता. बुमराह बाँडला आपला गुरू मानतो. त्यामुळेच बुमराह न्यूझीलंडमध्ये गेला आणि तेथे पाठीवर शस्त्रक्रिया करून घेतली.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या वर्षी सप्टेंबरपासून टीम इंडियातून बाहेर आहे. अशा स्थितीत बुमराहबाबत BCCIने वक्तव्य अद्याप आलेले नाही. पण बुमराहला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान २४ आठवडे लागतील असे मानले जात आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्यापासून तो नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात करेल. मात्र, सप्टेंबरमध्ये होणार्‍या आशिया कपमध्ये बुमराहला खेळणे शक्य नाही. आता जर सर्व काही ठीक झाले तर बुमराह थेट वन डे वर्ल्ड कप २०२३  मध्ये खेळताना दिसू शकतो. जो ऑक्टोबर महिन्यापासून भारतात खेळला जाणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघ
Open in App