Join us  

भारताचा 'हा' डावखुरा गोलंदाज बराच काळ संघाबाहेर; कमबॅकसाठी IPL हाच शेवटचा पर्याय!

जहीर खान, इरफान पठाण अन् आशिष नेहरानंतर या गोलंदाजावर BCCIने दाखवला होता विश्वास पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 3:37 PM

Open in App

Team India Left Arm Pacer: भारतीय क्रिकेटला दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा इतिहास आहे. कपिल देव, जवागल श्रीनाथ, अजित आगरकर, इशांत शर्मा यासारख्या गोलंदाजांनी टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करून दाखवली. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांनी देखील भारताच्या विजयात अनेकदा सिंहाचा वाटा उचलला. जहीर खान, आशिष नेहरा आणि इरफान पठाण या गोलंदाजांनी संघात दीर्घकाळ आपले स्थान कायम राखले आणि भारतीय चाहत्यांना आनंदाचे अनेक क्षण दिले. याच यादीत एक गोलंदाज २०१८ साली दाखल झाला. पण त्याला फारशी चांगली कामगिरी जमली नसल्याने तो बराच काळ संघाबाहेर आहे. आगामी IPL हे त्याच्यासाठी टीम इंडियात कमबॅक करण्याची शेवटची संधी असणार आहे.

राजस्थानमधील टोंक शहरात टेनिस-बॉल क्रिकेट खेळून मोठा झालेल्या या खेळाडूचं नाव आहे खलील अहमद. आज त्याचा वाढदिवस आहे. तो आज 26 वर्षांचा झाला. त्याच्या हातात क्रिकेट खेळण्यासाठी अजून अनेक वर्षे आहेत. पण काही काळापासून तो संघाबाहेर आहे. 2018 मध्ये जेव्हा त्याने टीम इंडियासाठी पदार्पण केले तेव्हा खलील दीर्घकाळ टीम इंडियामध्ये राहिल असे बोलले जात होते. पण त्याची गोलंदाजी फारशी परिणामकारक दिसली नाही. त्यामुळे त्याला फार लवकर संघाबाहेर पाठवण्यात आले. त्यामुळे आता खलीलला टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी IPL 2024 हाच एक मार्ग असल्याचे दिसते.

खलील अहमदने भारतासाठी 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या आणि 14 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 13 विकेट्स आहेत. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाच्या नावावर आयपीएलच्या 43 सामन्यांत 57 बळी आहेत. 2019 मध्ये त्याने सर्वाधिक 19 विकेट्स घेतल्या. 2022 मध्ये त्याने 16 बळी टिपले. आता दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे आणि लिलावापूर्वी त्याला कायम ठेवले आहे. त्याच्या यंदाच्या IPL चा त्याला किती फायदा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतदिल्ली कॅपिटल्सआयपीएल २०२३