'तंटामुक्ती सीन!' टीम इंडियाच्या जर्सीवर छापण्यात आलं पाकिस्तानचं नाव, जाणून घ्या त्यामागचं कारण...

Pakistan's Name on India's Jersey: या मुद्यावरून वादग्रस्त सीन निर्माण होण्याची शक्यता होती. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 10:27 IST2025-02-18T10:21:34+5:302025-02-18T10:27:16+5:30

whatsapp join usJoin us
Team India Jersey With Pakistan Name For Champions Trophy 2025 As BCCI Follow As Per ICC rule | 'तंटामुक्ती सीन!' टीम इंडियाच्या जर्सीवर छापण्यात आलं पाकिस्तानचं नाव, जाणून घ्या त्यामागचं कारण...

'तंटामुक्ती सीन!' टीम इंडियाच्या जर्सीवर छापण्यात आलं पाकिस्तानचं नाव, जाणून घ्या त्यामागचं कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India New Jersey With Pakistan Name For Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या हंगामाला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी सहभागी आठ संघाच्या नव्या जर्सीची झलक पाहायला मिळत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिल्यावर भारतीय संघ पाकिस्तानच्या नावाची जर्सी घालणार का? हा प्रश्न चांगलाच चर्चेत होता. याच उत्तर अखेर मिळालं आहे. भारतीय संघाच्या नव्या जर्सीची झलक समोर आली असून नव्या जर्सीवर पाकिस्तानचे नावही छापल्याचे दिसून येते. या मुद्यावरून वादग्रस्त सीन निर्माण होण्याची शक्यता होती. पण अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीआधी बीसीसीआयने यजमानांना त्यांचा मान देत तंटामुक्त सीनची झलक दाखवून दिलीये.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

या कारणामुळे टीम इंडियाला आपल्या जर्सीवर छापावं लागलं पाकिस्तानचं नाव

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमानुसार, आयसीसीच्या स्पर्धेत जो यजमान संघ असेल त्याचे नाव सहभागी संघाच्या जर्सीवर छापले जाते. याच नियमानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) टीम इंडियाच्या नव्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापायला राजी झाल्याचे दिसते. 

आधी लॉन्च करण्यात आलेल्या जर्सीत दिसलं नव्हतं नाव, पाकिस्तानातून आल्या तिखट प्रतिक्रिया

ज्यावेळी पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची  टीम इंडियाची जर्सी लॉन्च करण्यात आली होती त्यावेळी त्यावर पाकिस्तान नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. या मुद्यावरून पाकिस्तानमधून काही तिखट प्रतिक्रियाही उमटल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता आता बीसीसीआयने जे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत भारतीय संघाच्या जर्सीवरील  उजव्या बाजूला ठळक अक्षरात चॅम्पियन्स असं लिहिलं आहे. त्याच्या खाली ट्रॉफी २०२५ पाकिस्तान असं छोट्या अक्षरात छापल्याचे दिसून येते. जर्सीवर डाव्या बाजूला बीसीसआयचा लोगो आणि मधोमध 'इंडिया' असं भगव्या रंगात लिहिले आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी टीम इंडियाला मोठा धक्का

हायब्रिड मॉडेलनुसार, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आपले सर्व सामने दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. २० फेब्रुवारीला भारत-बांगलादेश अशी रंगत पाहायला मिळेल. त्यानंतर २३ फेब्रुवारीला भारत-पाक महामुकाबला आणि त्यानंतर २ मार्चला भारतीय संघ साखळी फेरीतील अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसेल. एका बाजूला स्पर्धेसाठी भारतीय संघ दुबईत पोहचला असताना भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल मायदेशी परतलाय. दक्षिण आफ्रिकेच्या माजी गोलंदाजाच्या वडिलांचे निधन झाले असल्याने तो घरी गेला आहे. आधीच जसप्रीत बुमराह आउट त्यात आता गोलंदाजी कोचशिवाय टीम इंडियाला मैदानात उतरावे लागणार आहे. हा भारतीय संघाला एक प्रकारचा मोठा धक्काच आहे. 

Web Title: Team India Jersey With Pakistan Name For Champions Trophy 2025 As BCCI Follow As Per ICC rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.