Team India In ICC Finals, IND vs NZ Champions Trophy 2025 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात Champions Trophy 2025 ची फायनल उद्या रविवारी, ९ मार्चला रंगणार आहे. दुबईच्या स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाने CT 2025 मध्ये आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही. आधी बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया अशा चार संघांना पराभूत करून भारताने फायनल गाठली आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तान, बांगलादेश यांना साखळी फेरीत तर आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये हरवून फायनल गाठली. न्यूझीलंडने CT 2025 मध्ये केवळ एक सामना गमावला असून, तो सामना भारताविरूद्धचा होता. त्यामुळे भारतीय संघ उद्याच्या फायनलमध्ये प्रबळ दावेदार मानला जात आहे. पण रविवार हा दिवस आणि भारतीय संघाची ICC स्पर्धेची फायनल यांचा एक अजब दुर्दैवी योगायोग आहे.
टीम इंडिया जेव्हा जेव्हा 'चॅम्पियन' बनली...
भारताने आतापर्यंत जिंकलेली सर्व आयसीसी विजेतेपदे फक्त सोमवार ते शनिवार या दरम्यान जिंकली आहेत. रविवारी झालेल्या कोणत्याही अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवलेला नाही. १९८३ पासून ते अगदी २०२४ पर्यंत हा प्रकार सुरूच आहे. १९८३ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना शनिवारी, २५ जूनला खेळला गेला आणि भारत जिंकला. त्यानंतर भारताने २००७ च्या टी२० विश्वचषकात पुढचे विजेतेपद जिंकले. त्याचा अंतिम सामना सोमवारी, २४ सप्टेंबरला खेळला गेला होता. २०११ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना २ एप्रिलला झाला. त्यात भारत जिंकला. तो दिवस शनिवार होता. चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलायचे तर, २०१३ चा विजेतेपदाचा विजय देखील सोमवारीच झाला. तसेच, २९ जून २०२४ ला जेव्हा टीम इंडियाने टी२० विश्वचषक ट्रॉफी उंचावली, तो देखील शनिवार होता.
![]()
भारताने रविवारी एकही अंतिम सामना जिंकला नाही...
हा निव्वळ योगायोग नाही. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पहिला पराभव न्यूझीलंडविरुद्ध झाला होता. सुमारे २५ वर्षांपूर्वी, आयसीसी नॉकआउट (आताची चॅम्पियन्स ट्रॉफी) चा अंतिम सामना रविवार १५ ऑक्टोबर २००० रोजी खेळला गेला आणि भारत त्यात हरला. त्यानंतर २००३ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना २३ मार्च रोजी झाला, तो देखील रविवार होता. पुढचा पराभव २०१४ च्या टी२० विश्वचषकात झाला, ज्याचा अंतिम सामना रविवार ६ एप्रिल रोजी झाला. त्यानंतर पाकिस्तानने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये हरवले. तो पराभवही रविवार, १८ जून रोजी झाला. तसेच, १९ नोव्हेंबर २०२३ हा देखील रविवार होता, जेव्हा ऑस्ट्रेलियाने सुमारे दीड अब्ज भारतीयांना 'गप्प करून' वनडे वर्ल्डकप जिंकला.
Web Title: Team India had never won ICC tournament Final on Sunday weird unfortunate coincidence IND vs NZ Champions Trophy Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.