राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. यानंतर, आता भारत मालिकेत २-१ च्या फरकाने आघाडीवर आहे. या सामन्यात टीम इंडियाकडून स्पिनर वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. मात्र, असे असतानाही, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. याशिवाय, त्याच्या नावे एका लज्जास्पद विक्रमाचीही नोंदला झाली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन वेळा ५-५ विकेट घेऊनही संघाला सामना जिंकूण देऊ न शकलेला तो एकमेव गोलंदाज आहे. त्याला दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला.
'स्पिनर बुमराह' -या सामन्यात 5 विकेट घेऊनही विजय न मिळाल्याने वरून निराश दिसला. त्याने त्याची कामगिरी उत्कृष्ट म्हणण्यास नकार दिला असून गोलंदाजीत आणखीही सुधारणा करण्याची संधी अल्याचे म्हटले आहे. वरूनच्या राजकोटमधील कामगिरीनंतर त्याची तुलाना आता जसप्रीत बुमराहसोबत केली जाऊ लागली आहे. सोशल मीडियावर तर त्याला 'बुमराह ऑफ स्पिन' असेही म्हटले जाऊ लागले आहे. सध्या बुमराह तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने २०२४ चा आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर आणि २०२४ चा आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे.
2021 मध्ये व्हावे लागले होते संघातून बाहेर -आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर वरुणची २०२१ च्या टी२० विश्वचषकासाठी निवड करण्यात आली होती. मात्र त्याला युएईमध्ये काही विशेष कामगिरी करता आली नाही. भारतीय संघ सुपर-१२ मधूनही बाहेर पडला होता. यानंतर वरुणला संघातून वगळण्यात आले होते. यानंतर पुनरागमनासाठी त्याला तीन वर्षे लागली होती.
बुमराह सारखेच आहेत आकडे -टीम इंडियातून बाहेर होण्यापूर्वी वरुणने ६ सामन्यांमध्ये केवळ २ विकेट घेतल्या होत्या. खरे तर, त्याला ४ सामन्यांमध्ये यशही मिळाले नव्हते. आता पुनरागमनानंतर वरून ने १० सामन्यांमध्ये २७ विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला केवळ एकाच सामन्यात विकेट मिळाली नव्हती. वरुणचा स्ट्राईक रेट ८.८ तर गोलंदाजीची सरासरी १०.९६ आहे. साधारणपणे अशी आकडेवारी जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजाशी संबंधित असतात. वरून आता फलंदाजांसाठी काळ सिद्ध होत आहे आणि सूर्यकुमार यादवच्या संघासाठी मुख्य बॉलर बनला आहे.