Join us

Shikhar Dhawan Bollywood Debut: टीम इंडियाचा 'गब्बर' करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण! कसा आहे शिखर धवनचा चित्रपटातील रोल, जाणून घ्या...

धवन सोशल मीडियावर विविध व्हिडीओ पोस्ट करत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 20:25 IST

Open in App

Shikhar Dhawan Bollywood Debut: टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. धवन विनोदी मीम्स आणि इन्स्टाग्राम रिल्स बनवून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. आता धवन बॉलिवूडच्या चित्रपटातही धमाका करण्यास सज्ज झाला आहे. एका अहवालातील दाव्यानुसार, टीम इंडियाचा 'गब्बर' लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतो. शिखरने आपल्या वाट्याचे शूटिंग पूर्ण केले आहे. पण याबद्दलच्या गोष्टी जाणूनबुजून गुपित ठेवल्या जात आहेत. पण विशेष बाब म्हणजे, शिखर धवनचा चित्रपटातील रोल हा कॅमिओ (छोटी भूमिका) नसून तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

एका सूत्राच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, शिखर धवन नेहमी अभिनेत्यांचा आदर करतो. जेव्हा त्याला या भूमिकेची ऑफर देण्यात आली, तेव्हा तो यासाठी आनंदाने सहभागी झाला. निर्मात्यांना असे वाटले की शिखर या भूमिकेसाठी योग्य आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी निर्मात्यांनी धवनशी संपर्क साधला. चित्रपटातील त्याची भूमिका ही मोठी आहे. त्याची चित्रपटातील भूमिका ही कॅमिओ नाही. चित्रपटासाठी त्याची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. तसेच, हा चित्रपट यंदाच्या वर्षीच प्रदर्शित होऊ शकतो.

IPLच्या सध्याच्या हंगामात शिखर धवन जबरदस्त खेळत आहे. धवनने आतापर्यंत १३ सामन्यांत १२३च्या स्ट्राइक रेटने ४२१ धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. धवनने जरी दमदार कामगिरी केली असली, तरी त्याचा संघ पंजाब किंग्जची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. यंदा त्यांची प्लेऑफ गाठण्याची शक्यता फारच कमी आहे. पंजाब सध्या १३ सामन्यांत सहा विजयांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

टॅग्स :शिखर धवनआयपीएल २०२२बॉलिवूडपंजाब किंग्स
Open in App