मुंबईचा फलंदाज वर्ल्ड कपला मुकणार, KL राहुलबाबतही आले महत्त्वाचे अपडेट्स

5 ऑक्टोबरला वर्ल्ड कप सुरू होत आहे. याचे आयोजन भारतात करण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 03:59 PM2023-06-29T15:59:54+5:302023-06-29T16:02:03+5:30

whatsapp join usJoin us
team india for odi world cup 2023 Mumbai batsman will miss the World Cup, important updates about KL Rahul too | मुंबईचा फलंदाज वर्ल्ड कपला मुकणार, KL राहुलबाबतही आले महत्त्वाचे अपडेट्स

मुंबईचा फलंदाज वर्ल्ड कपला मुकणार, KL राहुलबाबतही आले महत्त्वाचे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करत असलेली आशिया कप स्पर्धेला अद्याप दोन महिने बाकी आहेत. महत्वाचे म्हणजे ही स्पर्धा यावेळी वनडे फॉरमॅटमध्ये होईल. यानंतर 5 ऑक्टोबरला वर्ल्ड कप सुरू होत आहे. याचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. या स्पर्धेपूर्वीच टीम इंडियाला झटका बसला आहे

स्टार फलंदा केएल राहुल (kl rahul) पूर्णपणे रिकव्हर होण्याच्या मार्गावर असल्याचे अपडेट अहे. राहुल लवकरच मॅच फिट होऊन पुनरागमन करू शकतो. तसेच, श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer) रिकव्हर होत आहे. या आशिया कप स्पर्धेकडे आगामी वनडे वर्ल्ड कप-2023 साठी एक सराव स्पर्धा म्हणून पाहिले जात आहे. या जोडीच्या आशिया कप स्पर्धेतील पुनरागमनावर बीसीसीआयचे संपूर्ण लक्ष असणार आहे. मात्र, सद्यस्थितीचा विचार करता, जसप्रीत बुमराह आणि राहुल हेच संघात पुनरागमन करू शकण्याची शक्यता आहे.

वर्ल्डकपसाठी फीट होऊ शकणार नाही श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) वर्ल्ड कपसाठी फिट होऊ शकणार नाही, अशी चिंता बीसीसीआयने व्यक्त केली आहे. यामुळेच, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन वनडे फॉर्मेटच्या प्लॅनमध्ये परत आले आहेत. हे दोघेही अय्यर प्रमाणेच स्पिनर आहेत. कारण वर्ल्ड कपचे बहुतांश सामने स्पिनर्ससाठी अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवरच खेळवले जाणार आहेत. यामुळे हे दोघेही सिलेक्टर्सच्या प्लॅनमध्ये आहेत. खरे तर, अय्यरच्या पाठीची सर्जरी झाली असली तरीही, त्याला अद्यापही पाठदुखीची समस्या आहे.

मेडिकल टीम धोका पत्करू इच्छीत नाही नाही -
बीसीसीआय अधिकारी म्हणाले, 'महिनाभराच्या ब्रेकनंतर बरीच मदत मिळाली आहे. पण असे असले तरी, दोघेही मॅच फिटनेसपासून बरेच दूर आहेत. पुढील महिन्यात राहुल एनसीएच्या सराव सामन्यांमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाही. बीसीसीआयची मेडिकल टीम ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप 2023 संदर्भात कुठल्याही प्रकारची जोखिम पत्करू इच्छित नाही. राहुला आशिया कपसाठी फिट करण्याची योजना आहे. त्याने वर्ल्डकपपूर्वी काही सामने खेळावेत अशी आमची इच्छा आहे. जर राहुल 100 टक्के फीट असेल, तर आपण आयरलंडविरुद्धच्या मालिकेत त्याचा फिटनेस बघू शकतो. अय्यरला आणि काही वेळ द्यावा लागेल.'
 

Web Title: team india for odi world cup 2023 Mumbai batsman will miss the World Cup, important updates about KL Rahul too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.