Join us

आयपीएलच्या फायनल दिवशीच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार? BCCI नं सुरु केली तयारी

२५ मे रोजी भारतीय 'अ' संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने यासंदर्भात तयारीही सुरु केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 19:44 IST

Open in App

India vs England : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसह अनेक परदेशी खेळाडू सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहेत. जगातील सर्वात मोठी स्पर्धा संपल्यावर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघाच्या या आगामी दौऱ्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. २५ मे रोजी भारतीय 'अ' संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने यासंदर्भात तयारीही सुरु केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

BCCI नं सुरु केली इंग्लंड दौऱ्याची तयारी

इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम संपल्यावर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज होईल. भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेआधी भारत 'अ' संघ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका नियोजित आहे. या दौऱ्यासाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. पण बीसीसीआयने या दौऱ्याची तयारी सुरु केली आहे. 

१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

भारत 'अ' संघ कधी उतरणार मैदानात?

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आयपीएलमधील नॉकआउट लढतीचा भाग नसणारे खेळाडू भारतीय 'अ' संघातून सर्वात आधी इंग्लंडला रवाना होतील. अन्य खेळाडू आयपीएल स्पर्धा संपल्यावर संघाला जॉईन होतील. भारत 'अ' संघाच्या इंग्लड दौऱ्यावरील चार दिवसीय तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात ३० मे रोजी कँटरबरीच्या मैदानातील लढतीनं होणार आहे.

असा असेल भारताचा इंग्लंड दौरा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जून २०२५ पासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानात रंगणार आहे. ओव्हलच्या मैदानातील पाचव्या लढतीनं या दौऱ्याची सांगता होईल. या मालिकेसाठी भारतीय वरिष्ठ संघातील खेळाडू जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडला रवाना होणं अपेक्षित आहे.

  • २०  ते २४ जून, २०२५ इंग्लंड विरुद्ध भारत, पहिला कसोटी सामना, लीड्स
  • २ ते ६ जुलै, २०२५ इंग्लंड विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना, बर्मिंघम
  • १० ते १४ जुलै २०२५ इंग्लंड विरुद्ध भारत, तिसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
  • २३ ते २७ जुलै २०२५ इंग्लंड विरुद्ध भारत, चौथा कसोटी सामना, मँचेस्टर
  • ३१ जुलै ते ४ ऑगस्ट इंग्लंड विरुद्ध भारत, पाचवा कसोटी सामना, द ओव्हल

 

इंग्लड विरुद्धच्या मालिकेतील सर्व कसोटी सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार, दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरु होतील.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरूद्ध इंग्लंड २०२५