Join us  

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari ) हे राजकिय घडामोडींमुळे सतत चर्चेत असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 5:02 PM

Open in App

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari ) हे राजकिय घडामोडींमुळे सतत चर्चेत असतात. पण, बुधवारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी त्यांची भेट घेतली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या कामगिरीचा आलेख सतत चढा राहिला आहे. नुकतंच टीम इंडियानं पुण्यात खेळवण्यात आलेल्या वन डे मालिकेत २-१ असा विजय मिळवला आहे. तत्पूर्वी ट्वेंट-२० ( ३-२) व कसोटी ( ३-१) मालिकेतही टीम इंडियानं जबरदस्त कमबॅ करताना इंग्लंडच्या संघाला पाणी पाजले. कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. भारतीय खेळाडूंनी या यशाचं श्रेय प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिले.  SRHला मोठा धक्का: सततच्या बायो-बबलला कंटाळून प्रमुख खेळाडूचा IPL 2021 त खेळण्यास नकार!

विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यातला दुरावा मिटवलाइंग्लंडविरुद्ध मालिका सुरू असताना बायो बबलच्या नियमांमुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडे बराच वेळ होता. या कालावधीत प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघ व्यवस्थापनानं दोन्ही खेळाडूंशी चर्चा केली. शास्त्री यांनी विराट आणि रोहितशी संवाद साधला. एकमेकांशी बोला आणि काही वाद असल्यास मिटवा, असा सल्ला शास्त्रींनी दोघांना दिला. त्यानंतर दोघांनी संघ सहकारी म्हणून नव्यानं आपल्या नात्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.  न्यूझीलंडच्या फलंदाजानं दिला विराट कोहलीला धक्का; IPL 2021पूर्वी बसला मोठा झटका

रवी शास्त्री यांची क्रिकेटपटू म्हणून कारकीर्दरवी शास्त्री यांनी ८० कसोटी व १५० वन डे सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं. कसोटीत त्यांच्या नावावर ३८३० धावा व १५१ विकेट्स आहेत, तर वन डेत त्यांनी ३१०८ धावा आणि १२९ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या नावावर एकूण १५ शतकं व ३० अर्धशतकं आहेत. चार्टर्ड प्लेन न पाठवल्यास मुंबई इंडियन्सचा तगडा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकणार; रोहित शर्माचं टेंशन वाढणार!  

टॅग्स :रवी शास्त्रीभगत सिंह कोश्यारी