IPL 2021 : चार्टर्ड प्लेन न पाठवल्यास मुंबई इंडियन्सचा तगडा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकणार; रोहित शर्माचं टेंशन वाढणार!  

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी सर्व फ्रँचायझी सज्ज झाल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्स ( CSK) मुंबईत दाखल झाला आहे, मुंबई इंडियन्सही चेन्नईत पोहोचले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 03:21 PM2021-03-31T15:21:34+5:302021-03-31T15:22:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Mumbai Indians all set to miss services of Quinton de Kock for MI vs RCB opening game | IPL 2021 : चार्टर्ड प्लेन न पाठवल्यास मुंबई इंडियन्सचा तगडा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकणार; रोहित शर्माचं टेंशन वाढणार!  

IPL 2021 : चार्टर्ड प्लेन न पाठवल्यास मुंबई इंडियन्सचा तगडा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकणार; रोहित शर्माचं टेंशन वाढणार!  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

यंदाच्या आयपीएलमध्ये संघांना तटस्थ ठिकाणी खेळावे लागणार आहेत. मुंबई इंडियन्सचे खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत आणि नेहमीप्रमाणे MI जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. पण, ९ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्यांना मोठा धक्का बसला आहे. ( MI vs RCB Quinton De Kock). मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज सलामीवीर क्विंटन डी कॉक पहिल्या सामन्याला मुकणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. ( Mumbai Indians (MI) are set to miss their star opener nd wicket-keeper, Quinton de Kock). २८ वर्षीय क्विंटनचा दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. IPL 2021: बाप तशी लेक; रोहित शर्माच्या मुलीनं हेल्मेट घालून लगावला 'हिटमॅन'सारखा षटकार, Video 

क्विंटन डी कॉक प्रमाणे कागिसो रबाडा व अॅनरिच नॉर्टजे ( दोघंही दिल्ली कॅपिटल्स), लुंगी एनगिडी ( चेन्नई सुपर किंग्स ) आणि डेव्हिड मिलर ( राजस्थान रॉयल्स) यांचाही वन डे मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघात समावेश केला गेला आहे. त्यामुळे आयपीएल २०२१साठी ते उशीरानं भारतात दाखल होणार आहेत. २ एप्रिलपासून पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं दुसऱ्य वन डेनंतर आयपीएलसाठी खेळाडूंना जाण्याची परवानगी दिली आहे. पण, ४ एप्रिलनंतर क्विंटन भारतात परतल्यास त्याला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. चार्टर्ड प्लेनची सोय केल्यास क्विंटन पहिला सामना खेळू शकतो. विराट कोहलीचं BCCIनं ऐकलं; वादग्रस्त नियम रद्द करून जाहीर केली नियमावली!

नेमकं काय प्रकरण?
२, ४ व ७ एप्रिल या तारखांना वन डे सामने होणार आहेत आणि त्यानंतर चार सामन्यांची ( १०, १२, १४ व १६ एप्रिल) ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. डी कॉकचा वन डे संघात समावेश केल्यानं तो ७ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय कर्तव्यावर आहे आणि त्यानंतर आयपीएलसाठी भारतात येईल. पण, कोरोनामुळे त्याला किमान ७ दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकेल. मुंबई इंडियन्सला पराभूत करणं अवघड, 'हे' खेळाडू ठरणार ट्रम्प कार्ड; दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

काय पर्याय 

  • क्रमांक १ - एका बबलमधून दुसऱ्या बबलमध्ये आल्यानंतर खेळाडूला ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागतो. असे झाल्यास क्विंटन दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.  
  • क्रमांक २ - मुंबई इंडियन्सनं क्विंटन डी कॉकसाठी चार्टर्ड प्लेनची सोय केल्यास त्याला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार नाही आणि तो सलामीचा सामना खेळू शकतो. अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही.  

कोणाला मिळेल संधी?
मुंबई इंडियन्सचा बॅक अप सलामीवीर ख्रिस लीन मुंबईत दाखल झाला आहे. डी कॉकच्या अनुपस्थितीत तो रोहित शर्मासोबत सुरुवातीच्या काही सामन्यांना सलामीला उतरू शकतो.  २०१८ व २०१९च्या आयपीएलमध्ये लीननं २९ सामन्यांत ८९६ धावा केल्या होत्या. इशान किशन किंवा सौरव तिवारी हे दोन पर्याय सलामीवीर म्हणून विचारात घेतले जाऊ शकतात.  रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी; जाणून घ्या ८ फ्रँचायझींचे कर्णधार अन् त्यांचे वय!

Read in English

Web Title: IPL 2021: Mumbai Indians all set to miss services of Quinton de Kock for MI vs RCB opening game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.