Join us

आयकॉनिक व्हाइट जॅकेट अन् टीम इंडियाचं सेलिब्रेशन; 'जस्ट लुकिंग लाइक अ वॉव' (VIDEO)

हार्दिक पांड्यानं व्हाइट जॅकेटमध्ये दाखवला टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर दाखवलेला तोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 23:10 IST

Open in App

दुबईच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मॅचमध्ये टीम इंडियानं इतिहास रचला. २५ वर्षांचा हिशोब चुकता करत टीम इंडियानं १२ वर्षांनी म्हणजे २०१३ नंतर आयकॉनिक व्हाइट जॅकेटमध्ये मिरवण्याचा क्षण अनुभवला. विक्रमी तिसऱ्या जेतेपदानंतर  कॅप्टन रोहित शर्माचा अंदाज, विराट कोहलीचा बाज अन् हार्दिक पांड्याच्या सेलिब्रेशनचा स्वॅगसह टीम इंडियातील ट्रॉफी उचलल्यानंतरचे सेलिब्रेशन सगळचं अगदी जस्ट लुकिंग लाइक  अ वॉव सीन दाखवणारे होते.  

  'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

एकाही मॅचमध्ये टॉस नाही जिंकला, पण मॅच जिंकण्यात तो अडथळा नाही ठरला

पाकिस्तानच्या यजमान असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघानं आपेल सर्व सामने दुबईच्या मैदानात रंगले. रोहित शर्मानं या स्पर्धेत एकाही सामन्यात टॉस जिंकला नाही. पण दुसऱ्या बाजूला संघानं टॉस गमावल्यावर एकही सामना गमावला नाही. पहिली बॅटिंग असो वा धावांचा पाठलाग करण्याची वेळ असो टीम इंडियानं सर्वच्या पहिल्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत आपला विजयी धमाका कायम ठेवला.  

मेडल मिळाले मग आयकॉनिक व्हाइट जॅकेटसह सन्मान अन् ट्रॉफी उंचावरून सिलिब्रेशनचा अंदाज 

फायनल बाजी मारल्यावर भारतीय संघातील खेळाडूंना मेडल अन् आयकॉनिक जॅकेटसह सन्मानित करण्यात आले.  आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्या हस्ते चॅम्पियन संघाचा कॅप्टन रोहित शर्मानं चॅम्पियन ट्रॉफी स्विकाली. ट्रॉफी घेतल्यावर व्यासपीठावर संघातील खेळाडू आले अन् त्यांनी खास अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. कुलदीप यादव, श्रेयस अय्यर यांच्यासह हर्षित राणा आणि हार्दिक पांड्या यांचा अंदाज पुन्हा पुन्हा बघण्याजोगा होता.  

यजमान पाकिस्तान, पण रुबाब टीम इंडियाचा

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाने पाकिस्तामध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर हायब्रिड मॉडेलनुसार, भारताचे सर्व सामने दुबईत घेण्याचा निर्णय झाला. गत हंगामात भारतीय संघाला नमवल्याच्या टिमक्या वाजवणाऱ्या पाकिस्तानच्या संघानं भारतीय संघ साखळी फेरीत बाद झाला किंवा फायनलपर्यंत पोहचला नाही तर सेमीसह  फायनल सामना पाकिस्तानमध्ये खेळवायचा अशी बोलीही केली होती. पण आधी भारतीय संघानं पाकिस्तानला साखळी फेरीतच बाद केलं अन् दिमाखात फायनल गाठत ट्रॉफी पाकिस्तामधून दुबईत आणयला भाग पाडलं. एवढेच नाही तर दुबईत आता ही ट्रॉफी भारतात आणण्याच मिशनंही फत्तेह करून दाखवलं. त्यामुळे यजमान पाकिस्तान अन् रुबाब भारतीयांचा असा सीनही व्हाइट जॅकेटमधील टीम इंडियाच्या लूकमध्ये दिसून येतो.

 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माविराट कोहलीहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ