भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मंगळवारी सेंट किट्समधील वॉर्नर पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात ७६ धावा केल्या. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला २-१ अशी आघाडी घेतली. परंतु सूर्यकुमार यादवनं त्यानंतर आपल्या चाहत्यांसोबत असं काही केलं की त्याच्या कृतीनं सर्वांची मनं जिंकली.
बीसीसीआयने ट्विटरवर सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो गर्दीत आपल्या चाहत्यांशी हस्तांदोलन करताना आणि त्यांना ऑटोग्राफ देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये काही चाहते सूर्यकुमारसोबत सेल्फी घेतानाही दिसत आहेत.
सूर्यकुमार यादवने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वादळी खेळी करून मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत २० षटकांत ५ अर्धशतकं व १ शतक झळकावले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही त्याने ४४ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार मारत ७६ धावा चोपल्या. त्याने अल्झारी जोसेफला मारलेला नाद खुळा शॉट सर्वांचे लक्ष वेधून गेला. भारताने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.