Join us

Tanmay Singh: तुफान धुलाई! १३ वर्षांच्या मुलाने ठोकले ३८ षटकार अन् ३० चौकार, पाडला धावांचा पाऊस

तन्मयचा फटकेबाजीने संघाला गाठून दिली ६५० पार मजल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 21:26 IST

Open in App

Tanmay Singh Record: भारतात असे अनेक क्रिकेटपटू झाले आहेत ज्यांनी शालेय क्रिकेट किंवा क्लब क्रिकेटमध्ये आपल्या ऐतिहासिक खेळीने नाव कमावले आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, सरफराज खान, पृथ्वी शॉ यांचा या यादीत समावेश होतो. या खेळाडूंनी तरुण वयात ऐतिहासिक खेळी खेळून नाव कमावले. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. तन्मय सिंग असे एका खेळाडूचे नाव आहे. तन्मय हा अवघा १३ वर्षांचा असून त्याने १४ वर्षांखालील स्पर्धेत भला मोठा पराक्रम केला आहे.

ग्रेटर नोएडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सोमवारी देवराज स्पोर्ट्स क्लब आणि रायन इंटरनॅशनल क्रिकेट अकादमी यांच्यात झालेल्या सामन्यात तन्मयने अप्रतिम खेळी केली. त्याने आपल्या धडाकेबाज खेळीने संघाला बळ दिले. या सामन्यात रायन इंटरनॅशनलच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवराज स्पोर्ट्स क्लबचा फलंदाज तन्मय सिंगने धडाकेबाज खेळी केली. त्याने प्रतिस्पर्धी कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवला. तन्मयने या सामन्यात धडाकेबाज ४०१ धावा कुटल्या. आपल्या खेळीत त्याने केवळ १३२ चेंडू खेळून ३८ षटकार आणि ३० चौकार लगावले. ४०१ पैकी २२६ धावा त्याने षटकारांनी आणि १२० धावा चौकारांनी फटकावल्या.

तन्मयशिवाय रुद्र बिधुरी यानेही नाबाद १३५ धावांची दमदार खेळी केली. या फलंदाजाने आपल्या खेळीत १५ षटकार आणि ५ चौकार लगावले. या दोघांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर देवराज स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना ६५६ धावांची मोठी मजल मारली. या शानदार खेळासमोर रायन इंटरनॅशनल स्कूलचा संघ १९३ धावांत गारद झाला. देवराज स्कूलने हा सामना ४६३ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.

टॅग्स :शाळादिल्ली
Open in App