Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20I World Record : 'लिंबू टिंबू' संघाच्या कॅप्टनने मोडला हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड

पॉल स्टर्लिंगचा ऐतिहासिक पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 21:33 IST

Open in App

आयर्लंड क्रिकेट संघ सध्या संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात येत आहे. गुरुवारी दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानातून या द्विपक्षीय मालिकेची सुरुवात झाली.  या सामन्यात आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग याने मैदानात उतरताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना स्टर्लिंग ३ चेंडूत ८ धावांची खेळी करून बाद झाला. मात्र नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला. भारताचा माजी टी-२० वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने मोडीत काढला आहे. 

T20 World Cup 2026 : पाकची नवी नौटंकी! टीम इंडियाविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यावर बहिष्कार टाकणार?

पॉल स्टर्लिंगचा ऐतिहासिक पराक्रम

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम आता पॉल स्टर्लिंगच्या नावे झाला आहे. या आधी रोहित शर्मा या यादीत अव्वलस्थानी होती. रोहित शर्मानं आपल्या आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत भारताकडून १५९ सामने खेळल्याचा रेकॉर्ड आहे. पॉल स्टर्लिंग याने १६० व्या सामन्यात मैदानात उतरत रोहित शर्माला मागे टाकले. २०२४ च्या हंगामात भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिल्यावर रोहितनं छोट्या प्रारुपातील क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 

टी20I मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू

  • १६० – पॉल स्टर्लिंग*
  • १५९ – रोहित शर्मा
  • १५३ – जॉर्ज डॉकरेल*
  • १४८ – मोहम्मद नबी
  • १४४ – जोस बटलर
  • १४१ – महमुदुल्लाह

आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या चार खेळाडूंच्या यादीत दिसतो पॉल

आंतरराष्ट्रीय टी-२०  क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम ४४५३ धावांसह सर्वात आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ रोहित शर्मा (४२३१ धावा) आणि विराट कोहली (४१८८ धावा) यांच्यापाठोपाठ पॉल स्टर्लिंग चौथ्या स्थानावर आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत पॉलनं आयर्लंडकडून १६० सामन्यात ३८८२ धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात एका शतकासह २४ अर्धशतकांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Paul Stirling Breaks Rohit Sharma's Record in T20I Cricket

Web Summary : Ireland's Paul Stirling surpassed Rohit Sharma's record for most T20I appearances, playing his 160th match. While Stirling scored 8 runs, this achievement places him ahead of Sharma (159 matches). Stirling also ranks among the top T20I run-scorers with 3882 runs.
टॅग्स :टी-20 क्रिकेटरोहित शर्मा