लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शन गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात भर मैदानात कडाक्याचं भांडण झालं होतं. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने या दोघांची १०० टक्के मॅच फी दंड म्हणून वसूल केली. त्यानंतरही गंभीर या वादावर कमेंट करून चर्चेत होता. आता त्याची पुन्हा चर्चा रंगलीय आणि यावेळी त्याच्यासोबत LSG प्रवास संपवणार असे वृत्त समोर येतेय. IPL 2023 मधील लखनौ (LSG) संघाचा प्रवास गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर संपला.
संघाने पुढील आयपीएल हंगामाची तयारीही सुरू केली आहे. यासाठी त्यांनी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार फ्रँचायझी LSGने आयपीएल २०२४मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून संघाची जबाबदारी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन महान फलंदाज आणि माजी प्रशिक्षक जस्टिन लँगरशी संपर्क साधला आहे. LSG व्यवस्थापनाने जस्टिन लँगरशी विस्तृत चर्चा केली आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर तो पुढील वर्षी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेऊ शकतील. संजीव गोएंका यांच्या फ्रँचायझीला मुख्य प्रशिक्षकाची गरज आहे, कारण सध्याचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यासोबतचा दोन वर्षांचा करार IPL 2023 नंतर संपला आहे.
दरम्यान, मेंटॉर गौतम गंभीरच्याही बदलीची चर्चा आहे आणि तो पुन्हा कोलकाता नाइट रायडर्ससोबत काम करताना दिसेल असेही बोलले जातेय.