Join us
Daily Top 2Weekly Top 5

RR ची साथ सोडून तो CSK चा का झाला? संजूनं शेअर केली 'मेगा डील'संदर्भातील अनटोल्ट स्टोरी

संजू  अन् जडेजा यांच्यातील अदलाबदलीचा खेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:52 IST

Open in App

Sanju Samson Revealed Why He Left Rajasthan Royals And Joins Chennai Super Kings : आयपीएल २०२६ स्पर्धेतील यंदाच्या हंगामासाठी मिनी लिलावापूर्वी एक ऐतिहासिक ट्रेड डील पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन ट्रेडच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्सचा भाग झाला. दुसरीकडे चेन्नईतून अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाला RR च्या ताफ्यात सामील झाला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

संजू  अन् जडेजा यांच्यातील अदलाबदलीचा खेळ 

आता आयपीएल २०२६ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा पहिलाच सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात संजू सीएसकेच्या जर्सीत दिसेल, तर जडेजा राजस्थानच्या जर्सीत खेळताना दिसेल. दोन्ही स्टारसाठी हा सामना खास ठरेल. 

"पहला ही उड़ा देंगे…" संजूनं शेअर केला वैभव अन् कोच द्रविड यांच्यातील खास संवादाचा किस्सा (VIDEO)

नव्या इनिंगसंदर्भात काय म्हणाला संजू सॅमसन

नव्या संघाकडून नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज असलेल्या टी-२० वर्ल्ड कप विजेत्या सॅमसन याने पीटीआयशी संवाद साधला. यावेळी मेगा ट्रेड डिलसंदर्भात त्याने मनातली गोष्ट बोलून दाखवली. तो म्हणाला की, "मी राजस्थान रॉयल्स सोडली कारण मला वाटत होते की, त्या संघात माझा वेळ आता संपला आहे.  आता मी सीएसकेकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळण्याची ही माझी पहिलीच वेळ असेल, पण मैदानावर मी भावनांना वाव देत नाही. त्यांच्या विरोधातही मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन."

MS धोनीसोबत खेळण्यासाठी उत्सुक

महेंद्र सिंह धोनीसोबत खेळण्याची उत्सुकता बोलून दाखवताना संजू  म्हणाला की, "मी माही भाईंशी फोनवर बोललो आहे. त्याच्यासोबत एका संघाचा भाग होणे आणि खेळणे हा शानदार अनुभव असेल. मी याकडे त्यांच्याकडून शिकण्याची मोठी संधी म्हणून पाहतो."

संजूची RR संघासोबतची कारकिर्द

संजूने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून ११ हंगाम खेळले आहेत. यात २०१३ ते २०१५ या कालावधीत प्रथम फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २०१८ ते २०२५ दरम्यानही तो राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना दिसले. पिंक जर्सीत बरेच वर्ष खेळल्यावर आता संजू सॅमसन नव्या संघाकडून धमक दाखवताना दिसेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanju Samson reveals untold story of leaving RR, joining CSK.

Web Summary : Sanju Samson joined Chennai Super Kings via trade, citing his time with Rajasthan Royals was over. He looks forward to playing with MS Dhoni and against RR, aiming for his best performance. Jadeja joins RR.
टॅग्स :आयपीएल २०२६संजू सॅमसनचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्सरवींद्र जडेजामहेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२४