Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC Rain-Affected Matches Rules Explained : पावसाची बॅटिंग अन् प्रत्येकी ५ षटकांचा गेम! समजून घ्या 'हा' नियम

इथं जाणून घेऊयात सुपर ८ च्या लढतीत पावसाचा व्यत्यय आल्यास ICC चा नियम काय सांगतो? यासंदर्भातील सविस्तर माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 20:41 IST

Open in App

T20 World Cup Super-8 ICC Rules for Rain-Affected Matches Explained : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्याच लढतीत टॉसनंतर पावसाने बॅटिंगला सुरुवात केली. याआधी साखळी फेरीत श्रीलंकेतील पल्लेकेलेच्या मैदानातील झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामन्यावर पावसाने पाणी फेरले होते. आता टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा  साखळी फेरीतून सुपर ८ च्या  महत्त्वपूर्ण टप्प्यात गेली असली तरी इथंही साखळी फेरीतीलच नियम लागू आहे.  इथं जाणून घेऊयात सुपर ८ च्या लढतीत पावसाचा व्यत्यय आल्यास टी-२० सामन्यात प्रत्येकी ५-५ षटकांचा गेम कधी होऊ शकतो? ICC चा नियम काय सांगतो? यासंदर्भातील सविस्तर माहिती 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

 सुपर-८ फेरीत राखीव दिवसाची तरतूद आहे का?

आयसीसीच्या सध्याच्या नियमानुसार, सुपर-८ फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद नाही. गट टप्प्यात जसे नियम होते, तोच नियम या टप्प्यातील लढतींसाठीही लागू आहेत. फक्त उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पावसामुळे एखादा सुपर-८ सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर तो पुढील दिवशी हलवला जाणार नाही. हा सामना ‘वॉशआउट’ घोषित करुन दोन्ही संघांना समान गुण दिले जातील. 

 सामना निकाली लावण्यासाठी किती षटकांचा खेळ होणं गरजेचे?

ICC च्या नियमानुसार, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील अधिकृत निकालासाठी दोन्ही संघांनी किमान ५-५ षटके खेळणे आवश्यक आहे. पावसामुळे व्यत्यय आल्यास पंच आणि सामना अधिकाऱ्यांकडून ठराविक कट-ऑफ वेळेपर्यंत खेळ पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येकी ५ षटकांचा सामना खेळवणं शक्य झाले नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जातो. 

NZ vs PAK: पाकिस्तान- न्यूझीलंड सामना रद्द झाल्यास सेमीफायनलचं गणित कसं बदलणार? 'या' २ संघाचं होणार मोठं नु...

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात ८ वाजून ९ मिनिटांनी षटके कपातीला सुरुवात झाली. ICC च्या नियमानुसार, १० वाजून १६ मिनिटांपर्यंत सामना सुरु होण्याची प्रतिक्षा केली जाईल. ५-५ षटकांचा खेळ होण्यासाठी या वेळेत सामना सुरु व्हायला हवा. जर ते झालं नाही तर दोन्ही संघांना टॉसनंतर प्रत्येकी १-१ गुणांवरच समाधान मानावे लागेल.

 गुण विभागणीचा नेट रन रेटवर परिणाम होत नाही, पण...

सुपर-८ फेरीत प्रत्येक विजयासाठी २ गुण मिळतात. मात्र सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जातो. अशा वेळी कोणताही विजेता घोषित केला जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, रद्द झालेल्या सामन्यांचा नेट रन रेट (NRR) वर कोणताही परिणाम होत नाही. कारण NRR फक्त पूर्ण निकाल लागलेल्या सामन्यांवर आधारित मोजला जातो. पण यामुळे सेमीच समीकरण अधिक गुंतागुतीचे होऊ शकते. 

English
हिंदी सारांश
Web Title : ICC T20 World Cup: Rain Rules, 5 Overs Game Explained

Web Summary : Super 8 matches lack reserve days; rain means shared points. A 5-over game is needed for results. Washed-out games don't affect net run rate, complicating semi-final chances.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६आयसीसीपाकिस्तानन्यूझीलंडश्रीलंका