Join us

T20 World Cup, IND vs SCO Live Update : वाढदिवसाला विराट कोहलीनं नाणेफेक जिंकली, तीन फिरकीपटूंसह टीम इंडिया मैदानावर उतरली

T20 World Cup, India vs Scotland Live Update :  उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शक्यता दुसऱ्या संघांवर अवलंबून आहेत, अशा जर-तरच्या परिस्थितीत भारतीय संघ  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत  स्कॉटलंडविरुद्ध मैदानात उतरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 19:08 IST

Open in App

T20 World Cup, India vs Scotland Live Update :  उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शक्यता दुसऱ्या संघांवर अवलंबून आहेत, अशा जर-तरच्या परिस्थितीत भारतीय संघ  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत  स्कॉटलंडविरुद्ध मैदानात उतरेल. हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे. अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवल्यावर भारतीय संघाचे ही विजयी लय कायम राखण्याचे लक्ष असेल. भारताला या सामन्यात फक्त विजयच गरजेचा आहे नाही, तर नेट रनरेटदेखील सुधारण्याचे आव्हान आहे. त्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आणि दुसऱ्या संघांतील सामन्याचा परिणामदेखील अनुकूल असण्यावर आशा आहे. विराट कोहलीनं ( Virat Kohli) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 

पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांकडून भारताला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताची धावगतीदेखील खूपच खराब झाली. भारतासाठी आता प्रत्येक सामना करो अथवा मरो, असा असेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरोधात अपयशी ठरलेल्या भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना अफगाणिस्तान विरोधात लय सापडली. त्यांनी चांगला खेळ केला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येण्याच्या वादग्रस्त निर्णयानंतर रोहितने गेल्या सामन्यात पुन्हा डावाची सुरुवात केली. त्याने शानदार अर्धशतक करत आपला फॉर्म सिद्ध केला. त्याने सामन्यानंतर मान्य केले की, पहिल्या दोन सामन्यांत काही चुका झाल्या.

मात्र, सलग खेळल्याने मानसिक थकव्यामुळे अशा गोष्टी घडतात. रोहित, राहुल, ऋषभ पंत व हार्दिक पांड्या यांनी अफगाणविरुद्ध धावा केल्या. संघात परतलेल्या सूर्यकुमार यादवमुळे संघाची फलंदाजी मजबूत झाली आहे. त्यासोबतच रवींद्र जडेजाही तळाच्या क्रमावर उपयुक्त ठरला. गोलंदाजीमध्ये चार वर्षांनी खेळणाऱ्या आश्विनने चार षटकांमध्ये १४ धावा देत दोन बळी घेतले. 

आजच्या सामन्यात टीम इंडिया तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरणार आहे. शार्दूल ठाकूरच्या जागी वरुण चक्रवर्थीला संधी मिळाली आहे.

भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा,आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्थी. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतीय क्रिकेट संघविराट कोहली
Open in App