T20 World Cup, India vs Bangladesh : लोकेश राहुल व विराट कोहली या दोघांनी भारतीय संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आजही अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवने त्याच्या शैलीत फटकेबाजी केली, परंतु आज मोठी खेळी करण्यापासून चूकला. रिषभ पंतला सातत्याने बाकावर बसवून दिनेश कार्तिकला पुन्हा संधी दिली, परंतु अद्याप त्याने छाप पाडली नाही. आज तो करिष्मा करेल असे वाटत असताना त्याच्यावर अन्याय झाल्याची चर्चा सुरू झालीय. तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयावर चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विराट कोहलीने No Ball देण्याचा इशारा केला, शाकिब फलंदाजाकडे धावत आला अन्...
रोहित व लोकेश यांनी खणखणीत फटके मारून आशादायक चित्र दाखवले, परंतु रोहितने निराश केले. तस्कीन अहमनदने टाकलेल्या तिसऱ्या षटकात रोहित शर्मा ( Rohit Sharma)ने उत्तुंग फटका मारला, परंतु हसन महमूदने सोपा झेल टाकला. नेदरलँड्सविरुद्ध रोहितला जीवदान मिळाले होते आणि त्यानंतर त्याने अर्धशतक झळकावले होते. आजही रोहित या संधीचं सोनं करेल असे वाटले, परंतु पुढच्याच षटकात महमूदने भारताच्या कर्णधाराला चूक करण्यास भाग पाडले आणि यासीर अली करवी झेलबाद केले. लोकेश राहुल ( KL Rahul) व विराट कोहली ( Virat Kohli) याने दमदार फटकेबाजी करून भारताच्या धावांचा वेग वाढवला. लोकेशही ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून ५० धावांवर बाद झाला. विराटसह त्याने ६७ धावांची भागीदारी केली.
कार्तिक ( ७) रन आऊट झाला, त्यानंतर आलेला अक्षर पटेलही (७) लगेच माघारी परतला. विराटने अखेपर्यंत फटकेबाजी करताना भारताला मोठा पल्ला गाठून दिला. कार्तिक ( ७) रन आऊट झाला, त्यानंतर आलेला अक्षर पटेलही (७) लगेच माघारी परतला. विराटने अखेपर्यंत फटकेबाजी करताना भारताला मोठा पल्ला गाठून दिला. अश्विन यानेही चांगली फटकेबाजी केली. विराट ४४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६४ धावांवर नाबाद राहिला. भारताने ६ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला.
बॉल आधी स्टम्प्सवर आदळल्याने तिसऱ्या अम्पायरने कार्तिकला बाद दिले.
iframe src="https://www.t20worldcup.com/video/2887594" width="600" height="500" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen">
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"