Join us  

T20 World Cup Final, David Warner : IPL 2021मध्ये ज्याला पाणी द्यायला लावलं, त्याच डेव्हिड वॉर्नरनं वर्ल्ड कपमध्ये सर्वांना पाणी पाजलं; मोठा पुरस्कार जिंकला

T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : आयपीएल २०२१चे दुसरे पर्व दुबईत खेळवण्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला असेल, तर तो ऑस्ट्रेलियन संघाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 11:55 PM

Open in App

T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : आयपीएल २०२१चे दुसरे पर्व दुबईत खेळवण्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला असेल, तर तो ऑस्ट्रेलियन संघाला. न्यूझीलंडला पराभूत करून पहिले ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपद उंचावल्यानंतर संघातील अनेक खेळाडूंनी ते मान्यही केलं. पण, आयपीएल २०२१मध्ये खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याचं काम करण्यास भाग पाडणाऱ्या डेव्हिड वॉर्नरनं ( David Warner) कमाल केली. त्यानं फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मजबूत पाया रचला अन् मिचेल मार्श व अन्य सहकाऱ्यांना त्यावर जेतेपदाचा कळस चढवला. या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान वॉर्नरनं पटकावून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले अन् आयपीएल २०२२साठी आपला भावही वाढवला. वॉर्नरनं या  स्पर्धेत २८९ धावा केल्या आणि त्याला आयसीसीनं स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दिला.  न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) यानं  ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. हेझलवूनंच त्याची विकेट घेतली. हेझलवूडनं ४ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडनं २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच ( ५) अपयशी ठरला. डॅरील मिचेलनं अप्रतिम झेल टिपला. १५ धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. वॉर्नर व मार्श यांनी पहिल्या १० षटकांत १ बाद ८२ धावा उभारून दिल्या. त्यांना ६० चेंडूंत विजयासाठी ९१ धावा करायच्या होत्या. वॉर्नर ३८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला.  मार्श ५० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर नाबाद राहिला. मॅक्सवेलनं नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत ८ विकेट्स राखून विजय मिळवला. 

ऑस्ट्रेलियाचे हे सहावे जागतिक जेतेपद ठरले. त्यांनी पाच वेळा ( 1987, 1999, 2003, 2007, 2015)  वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे. वॉर्नरला आयपीएल २०२१च्या ८ सामन्यांत १९५ धावाच करता आल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादनं तर त्याला अखेरच्या काही सामन्यांत प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर केले. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात त्याच्याकडून नेतृत्वपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आणि त्याला खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाण्यास भाग पाडले  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१डेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलियान्यूझीलंडसनरायझर्स हैदराबाद
Open in App