Babar Azam : बॉल बॉय ते नंबर १; पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम वन डे पाठोपाठ ट्वेंटी-२०तही बनला अव्वल

ICC Men’s T20I Player Rankings पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तुफान फॉर्मात दिसत आहे. मंगळवारीही त्यानं नामिबियाविरुद्ध ७० धावांची खेळी करताना मोहम्मद रिझवान याच्यासह अनेक विक्रम मोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 03:58 PM2021-11-03T15:58:26+5:302021-11-03T15:59:46+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup : Babar Azam pips Dawid Malan to become No.1 T20I batter in ICC rankings | Babar Azam : बॉल बॉय ते नंबर १; पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम वन डे पाठोपाठ ट्वेंटी-२०तही बनला अव्वल

Babar Azam : बॉल बॉय ते नंबर १; पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम वन डे पाठोपाठ ट्वेंटी-२०तही बनला अव्वल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Men’s T20I Player Rankings पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तुफान फॉर्मात दिसत आहे. मंगळवारीही त्यानं नामिबियाविरुद्ध ७० धावांची खेळी करताना मोहम्मद रिझवान याच्यासह अनेक विक्रम मोडले. या सातत्यापूर्ण कामगिरीचे फळ त्याला मिळाले. वन डेसह त्यानं ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंडच्या डेविड मलान ( Dawid Malan) याला दुसऱ्या स्थानी ढकलताना बाबर नंबर १ बनला  आहे. रिकी पाँटिंग आणि विराट कोहली यांच्यानंतर वन डे व ट्वेंटी-२०त एकाच वेळी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान स्थान पटकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. 

बाबरनं अफगाणिस्तान व नामबिया यांच्याविरुद्ध अनुक्रमे ५१ व ७० धावा करताना २००९च्या विश्वविजेत्या पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. २७ वर्षीय बाबरनं २८ जानेवारी २०१८मध्येही ट्वेंटी-२०त अव्वल स्थान पटकावले होते आणि तो वन डेतही अव्वल स्थानी आहे. बाबरच्या खात्यात ८३४ रेटींग पॉइंट आहेत आणि तो दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मलानपेक्षा ३६ गुणांनी आघाडीवर आहे. बाबरनं ५ मे २०१९मध्ये ८९६ रेटींग पॉइंट मिळवले होते आणि ती त्याच्या कारकिर्दितील सर्वोत्तम कामगिरी होती.  

बाबर आजमचा प्रेरणादायी प्रवास 
इतर क्रिकेटपटूंप्रमाणे बाबरचा इथपर्यंतचा प्रवास खडतरच होता. लाहोरमध्ये जन्मलेल्या या खेळाडूनं पहिली बॅट हातात धरली ती रस्त्यावर क्रिकेट खेळण्यासाठी. साधारण प्रत्येक क्रिकेटपटू हा गल्ली क्रिकेट खेळल्यानंतरच मोठ्या मैदानावर स्वतःचे कौशल्य दाखवण्यासाठी उतरला असेल. १२व्या वर्षी त्यानं क्रिकेटला मनावर घेतलं आणि १४व्या वर्षी त्याला नॅशनल अकादमीनं प्रवेश देण्यास नकार दिला. ते त्याच्या आयुष्यातील पहिले आणि कदाचित अखेरचे अपयश असावे.

त्या अपयशातून तो खचला नाही, तर आणखी जोमानं तयारीला लागला आणि पुढील वर्षी नॅशनल अकादमीत प्रवेश मिळवला. इतकंच नाही तर त्याला देशातील १५ वर्षांखालील सर्वोत्तम फलंदाज म्हणूनही गौरविले गेले. या वर्षभरात त्यानं प्रचंड मेहनत घेतली. सकाळी १० वाजता दोन चुलत भावंड व काही मित्रांसह तो तासभर चालत मॉडेल टाऊन पार्क येथील मैदानावर नेट्समध्ये सराव करायला जायचा. रात्री ८ वाजेपर्यंत त्याचा हा सराव चालायचा.

३१ मे २०१५ मध्ये घरच्या मैदानावर त्यानं वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. लहानपणी तो ज्या मॉडेल टाऊन पार्कवर सराव करायचा तिथून लाहोरचं गड्डापी स्टेडियम पाच किमी अंतरावर आहे. हे पाच किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी त्याला सहा वर्षांहून अधिक काळ लागला. २० वर्षीय बाबरनं झिम्बाब्वेविरुद्धच्या त्या सामन्यात ६० चेंडूंत ५४ धावा केल्या.     २००७ मध्ये पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात सीमारेषेवर बॉल बॉय असलेला बाबर आज जागतिक वन डे  व ट्वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. 
 

विराट कोहली कितवा
ट्वेंटी-२० फलंदाजांमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ७१४ रेटींग पॉइंटसह पाचव्या, तर लोकेश राहुल ६७८ रेटींग पॉइंटसह ८व्या क्रमांकावर कायम आहेत. श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा यानं गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या तब्रेझ शम्सीला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये शाकिब अल हसन व अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी २७१ रेटींग पॉइंटसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. 

Web Title: T20 World Cup : Babar Azam pips Dawid Malan to become No.1 T20I batter in ICC rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.