T20 World Cup 2026: टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकू, शेवटी इतिहासच घडणार! फायनल सामना का आहे इतका खास?

India vs New Zealand: टी-२० विश्वचषक २०२६ चा महासंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल सामना खेळला जाणार असून या सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी क्रिकेटच्या इतिहासात नोंद होणार हे नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:10 IST2026-03-06T12:08:33+5:302026-03-06T12:10:41+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20 World Cup 2026: Whoever wins the World Cup, history will be made in the end! Why is the final match so special? | T20 World Cup 2026: टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकू, शेवटी इतिहासच घडणार! फायनल सामना का आहे इतका खास?

T20 World Cup 2026: टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकू, शेवटी इतिहासच घडणार! फायनल सामना का आहे इतका खास?

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याचा निकाल कोणाच्याही बाजूने लागला, तरी क्रिकेटच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची नोंद होणार हे निश्चित आहे. एकीकडे भारतीय संघ तिसऱ्या जेतेपदासाठी मैदानात उतरेल, तर दुसरीकडे न्यूझीलंड आपला पहिला विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज असेल. भारताला २०१४ मध्ये श्रीलंकेने, तर न्यूझीलंडला २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपदापासून रोखले होते. आता २०२६ च्या या ऐतिहासिक महामुकाबल्यात कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

भारताकडे जागतिक विक्रम करण्याची संधी

भारतीय संघाने आतापर्यंत दोन वेळा (२००७ आणि २०२४) टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. जर भारताने हा अंतिम सामना जिंकला, तर तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत जगातील पहिला संघ ठरेल. सध्या भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या तिन्ही संघांने प्रत्येकी दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे.

न्यूझीलंडसाठी दुष्काळ संपवण्याची वेळ

न्यूझीलंडच्या संघाने आजवर अनेकदा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. परंतु, त्यांना एकदाही टी-२० विश्वचषक उंचावता आलेला नाही. २०२१ च्या विश्वचषकात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे, यंदाचा सामना जिंकल्यास न्यूझीलंड पहिल्यांदाच विश्वविजेता बनून नवा इतिहास घडवेल.

टी-२० विश्वचषक विजेत्यांची यादी (२००७ - २०२४)

वर्षविजेता संघउपविजेता संघ
२००७भारतपाकिस्तान
२००९पाकिस्तानश्रीलंका
२०१०इंग्लंडऑस्ट्रेलिया
२०१२वेस्ट इंडिजश्रीलंका
२०१४श्रीलंकाभारत
२०१६वेस्ट इंडिजइंग्लंड
२०२१ऑस्ट्रेलियान्यूझीलंड
२०२२इंग्लंडपाकिस्तान
२०२४भारतदक्षिण आफ्रिका

Web Title : टी20 विश्व कप 2026 फाइनल: भारत या न्यूजीलैंड, इतिहास रचेगा!

Web Summary : भारत और न्यूजीलैंड के बीच टी20 विश्व कप 2026 का फाइनल ऐतिहासिक होगा। भारत तीसरे खिताब का लक्ष्य रखेगा, जबकि न्यूजीलैंड पहले की तलाश में है। पिछले फाइनल के गम इस मुकाबले को और रोमांचक बनाएंगे। सबकी निगाहें ऐतिहासिक मैच पर।

Web Title : T20 World Cup 2026 Final: History awaits India or New Zealand.

Web Summary : The T20 World Cup 2026 final between India and New Zealand promises history. India aims for a record third title, while New Zealand seeks their first. Previous final heartbreaks fuel their determination in this highly anticipated clash. All eyes on the historic match.