Pakistan Cricket clash Mike Hesson Salman Ali Agha Viral Video: टी२० विश्वचषक स्पर्धा २०२६ मध्ये पाकिस्तानने नामिबियाचा पराभव करत सुपर ८ मध्ये प्रवेश केला. असा दावा करण्यात येत आहे की, याचदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघात कोच आणि कर्णधार यांच्यातील तणावाचे वृत्त समोर येत आहे. सामन्यादरम्यान पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगाने २३ चेंडूत ३८ धावांची झुंज देणारी खेळी केली. परंतु त्यानंतर तो बाद झाल्याने चाहते आश्चर्यचकित झाले. सलमान डगआउटमध्ये परतताच, त्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांच्याशी जोरदार वाद घातला.
हेसन आणि सलमानमध्ये वाद
फील्ड कॅमेऱ्यांनी टिपलेल्या फुटेजनुसार, सलमान आणि माइक हेसन यांच्यातील संभाषण खूपच गंभीर असल्याचे दिसून आले. असे दिसून आले की प्रशिक्षक कर्णधाराच्या शॉट निवडीबद्दल किंवा खेळाच्या परिस्थितीबद्दल नाराज होते. वाद इतका वाढला की डगआउटमध्ये शांतता पसरली आणि इतर खेळाडू अस्वस्थ दिसले. त्यानंतर सलमान अली आगादेखील प्रशिक्षकांच्या टीकेवर आक्रमक प्रतिक्रिया देत असल्याचे दिसून आले.
सलमानने बाटली जमिनीवर फेकली
सलमान अली आगा याने रागाच्या भरात हातात असलेली पाण्याची बाटली जमिनीवर फेकल्याने वाद आणखी वाढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रिकेट चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.
टीम इंडियाविरुद्ध पराभव
भारतीय संघाने पाकिस्तान विरूद्धच्या साखळी सामन्यात दमदार कामगिरी केली. श्रीलंकेच्या पिचवर झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावांची खेळी केली होती. त्यात सलामीवीर ईशान किशनने झंझावाती ७७ धावांची खेळी केली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला फारशी चमक दाखवता आली नव्हती. त्यांना ६१ धावांनी पराभव झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली होती. पण नामिबियाविरूद्ध विजय मिळवून पाकिस्तानने पुढील फेरी गाठली.
Web Summary : Tensions flared in the Pakistan cricket team after a match, with coach Mike Hesson and captain Salman Ali Agha involved in a heated argument. Frustration over shot selection led to a dugout confrontation, escalating when Salman threw a water bottle.
Web Summary : एक मैच के बाद पाकिस्तान क्रिकेट टीम में तनाव बढ़ गया, कोच माइक हेसन और कप्तान सलमान अली आगा के बीच तीखी बहस हुई। शॉट चयन को लेकर निराशा के कारण डगआउट में टकराव हो गया, जब सलमान ने पानी की बोतल फेंक दी।