Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट

आयसीसी आणि बीसीसआयकडून ऑनलाईन तिकीट विक्रीची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:52 IST

Open in App

T20 World Cup 2026 Tickets’ Sale Goes Live  : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) आगामी टी-२० वर्ल्ड कप  स्पर्धेच्या तिकीट विक्रीची घोषणा केली आहे. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि श्रीलंकेच्या मैदानात रंगणाऱ्या पुरुष टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांच्या तिकीटासंदर्भातही ICC नं मोठा निर्णय घेतला असून फक्त १०० रुपयांमध्ये चाहत्यांना मैदानात जाऊन टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 आयसीसी आणि बीसीसआयकडून ऑनलाईन तिकीट विक्रीची घोषणा 

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सामन्याच्या नाणेफेकीनंतर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्करम या दोघांच्या हस्ते टी-२० वर्ल्ड कपच्या ऑनलाईन तिकीट विक्रीची घोषणा करण्यात आली. भारतीय क्रिकेट चाहते ICC च्या tickets.cricketworldcup.com या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून आपले तिकीट बूक करू शकतात. पहिल्या टप्प्यात ICC ने २० लाखांहून अधिक तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. यामागचा उद्देश म्हणजे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये क्रिकेट पाहण्याचा अनुभव आणखी उत्कृष्ट बनवणे हा आहे.

T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात

तिकीटासंदर्भातील  ऐतिहासिक निर्णयावर ICC सीईओ काय म्हणाले? 

ICC चे सीईओ संयोग गुप्ता म्हणाले की, तिकीटांचे दर १०० रुपये आणि LKR १००० पासून ठेवण्यामागचा उद्देश म्हणजे किफायतशीर दरात अधिकाधिक चाहत्यांना या स्पर्धेचा भाग बनवणे. २० संघ आणि ५५ सामन्यांसह २०२६ चा यंदाजा हंगाम ऐतिहासिक ठरेल, असेही ते म्हणाले आहेत. श्रीलंका क्रिकेटचे सीईओ अ‍ॅश्ले डी सिल्वा म्हणाले की, या आयोजनाचा भाग होण्याचा आम्हाला अभिमान आहे. चाहत्यांना शक्य तितक्या लवकर आपली आसनं निश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

भारत आणि श्रीलंकेतील कोणत्या मैदानात रंगणार टी-२० वर्ल्ड कपचा थरार?

  • नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद)
  • एम. ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)
  • अरुण जेटली स्टेडियम (नवी दिल्ली)
  • वानखेडे स्टेडियम (मुंबई)
  • ईडन गार्डन्स (कोलकाता)
  • आर. प्रेमदासा स्टेडियम (कोलंबो)
  • सिन्नहलीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राऊंड (कोलंबो)
  • पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (कँडी) 
English
हिंदी सारांश
Web Title : T20 World Cup 2026: Tickets at ₹100! ICC's Historic Decision.

Web Summary : ICC announces T20 World Cup 2026 ticket sales during India-South Africa match. Tickets start at ₹100, available on tickets.cricketworldcup.com. Over 2 million tickets are released initially, aiming to enhance the stadium experience for fans across India and Sri Lanka.
टॅग्स :आयसीसी विश्वचषक टी-२०आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी-२०आयसीसी