ICC T20 World Cup 2026 ENG vs SL 42nd Match Super 8 Group 2 : दुनिथ वेल्लालागे आणि महीश तीक्षणाच्या फिरकीच्या जादूसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. एका बाजूनं ठराविक अंतराने विकेट पडत असताना सलामीवीर फिल सॉल्टनं अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरणारी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने निर्धारित २० षटकांत १४६ धावा करत श्रीलंकेसमोर १४७ धावांचे टार्गेट सेट केले आहे. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
संघ अडचणीत असताना सॉल्टची फिफ्टी
कँडीतील पेल्लेकेलेच्या मैदानात दोन्ही संघ सुपर ८ मधील आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. श्रीलंकन कर्णधार दसुन शनाका याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकन गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. वेल्लालागे याने जोस बटलरच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर तीक्षणाने बेथल याला अवघ्या ३ धावांवर माघारी धाडल्यावर टॉम बॅन्टन याने ६ धावांवर धावबादच्या रुपात विकेट फेकली. एका बाजूनं विकेट पडत असताना फिल सॉल्टनं ४० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली.
श्रीलंकेकडून गोलंदाजीत वेल्लालागे अन् तीक्षणाचा जलवा!
श्रीलंकेचा युवा फिरकीपटू दुनिथ वेल्लालागे याने अर्धशतकवीर फिल सॉल्टसह संघाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ४ षटकातील कोट्यात त्याने २६ धावा खर्च करून सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश केला. त्याच्याशिवाय तीक्षणाने ४ षटकात २१ धावा खर्च करत आपल्या 'तीरंदाजी' सेलिब्रेशनसह लक्षवेधलं. दिलशान मधुशंखा यानेही ४ षटकांच्या कोट्यात २५ धावा खर् करत २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. तर चमीराला एक विकेट मिळाली.
Web Summary : Phil Salt's half-century wasn't enough; England's batting crumbled against Dunith Wellalage and Maheesh Theekshana's spin. England managed 146 in 20 overs, setting Sri Lanka a target of 147 in the T20 World Cup Super 8 match.
Web Summary : फिल साल्ट का अर्धशतक बेकार गया; दुनिथ वेल्लालागे और महीश तीक्षणा की फिरकी के सामने इंग्लैंड की बल्लेबाजी चरमरा गई। इंग्लैंड ने 20 ओवरों में 146 रन बनाए, श्रीलंका को 147 रनों का लक्ष्य दिया।