ICC T20 World Cup 2026 SL vs Oman 16th Match : कुसल मेंडिस, पवन रथनायके आणि कर्णधार दुसन शनाकाच्या अर्धशतकी खेळीनंतर अखेरच्या षटकात कामिंदू मेंडिसनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने ओमानविरुद्ध ५ विकेट्सच्या मोबदल्यात विक्रमी २२५ धावा करत २२६ धावांचे टार्गेट सेट केले आहे. श्रीलंकेतील कँडी येथील पल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात ओमानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवत ओमनाने चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर मध्यफळीतील फलंदाजांच्या जोरावर श्रीलंकेनं दमदार कमबॅक करत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपली सर्वोच्च धावसंख्या उभारली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका डावात तिघांची अर्धशतके, टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत चौथ्यांदा असं घडलं
पहिल्यांदा फलंदाजी करताना पथुम निसंका १३ (११) आणि कमिल मिशरा ८ (७) स्वस्तात माघारी फिरल्यावर विकेट किपर बॅटर कुसर मेंडिस याने ४५ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. पवन रथनायके याने २१४ च्या स्ट्राईक रेटनं २८ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६० धावांचे योगदान दिले. याशिवाय कर्णधार दसुन शनाका याने २० चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात एका डावात तीन अर्धशतके पाहायला मिळण्याची ही चौथी वेळ ठरली. याआधी २००७ च्या हंगामात भारत इंग्लंड यांच्यातील सामन्यासह २०१६ च्या हंगामात दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड आणि २०२२ मध्ये भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामन्यात एका डावात तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावल्याचे पाहायला मिळाले होते.
T20 World Cup 2026 : १० वर्षांनी इंग्लंडसमोर कॅरेबियन संघानं दाखवली पॉवर! सुपर ८ चा मार्गही मोकळा
श्रीलंकेची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या
ओमानविरुद्धच्या सामन्यातील अखेरच्या षटकात कामिंदू मेंडिसनं अवघ्या ७ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २७१ च्या स्ट्राइक रेटनं नाबाद १९ धावांची खेळी केली. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील आपली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावंसख्या उभारली. याआधी २००७ च्या हंगामात केनियाविरुद्ध त्यांनी ६ विकेट्सच्या मोबदल्यात २६० धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
Web Summary : Sri Lanka set a target of 226 against Oman in the T20 World Cup. Mendis, Rathnayake, and Shanaka scored half-centuries, leading Sri Lanka to a record-breaking 225/5 after Oman chose to bowl. Early wickets didn't deter Sri Lanka's comeback.
Web Summary : टी20 विश्व कप में श्रीलंका ने ओमान के खिलाफ 226 रनों का लक्ष्य रखा। मेंडिस, रथनायके और शनाका ने अर्धशतक बनाए, जिससे श्रीलंका ने रिकॉर्ड तोड़ 225/5 रन बनाए। शुरुआती विकेट श्रीलंका की वापसी को नहीं रोक पाए।