T20 World Cup 2026 Semi Final IND VS ENG : गत वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाने संजू सॅमसनच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर कॅरेबियन संघाने दिलेल्या विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून दाखवत सेमीफायनलचं तिकीट मिळवलं. कोलकाताच्या ऐतिहिसाक ईडन गार्डन्सच्या मैदानातील सामन्यानंतर यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपच्या हंगामातील चारही सेमीफायलिस्ट पक्के झाले आहेत.
सेमीफायलचे चारही संघ ठरले
सुपर ८ मधील पहिल्या गटातून भारतीय संघा आधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अव्वलस्थानासह सेमीत एन्ट्री मारली होती. याशिवाय दुसऱ्या गटातून इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांनी सेमीच तिकीट बूक केले आहे. इथं एक नजर टाकुयात सेमीफायलमध्ये कोणता संघ कुणाविरुद्ध भिडणार? कोणत्या मैदानात रंगणार सेमीफायलचा थरार यासंदर्भातील सविस्तर माहिती
IND vs WI : एकच वादा सूर्या दादा... हवेत झेपावत अविश्वसनीय झेल घेत लुटली मैफिल (VIDEO)
भारतीय संघाने सहाव्यांदा गाठली सेमीफायनल
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या हंगामात सहाव्यांदा भारतीय संघाने सेमीफायलमध्ये प्रवेश केला आहे. कमालीचा योगायोग म्हणजे भारतीय संघ सेमीफायलमध्ये ज्या इंग्लंडला भिडणार आहे त्यांनही सहाव्यादा सेमीफायल गाठली आहे. या दोन संघाशिवाय पाकिस्तान एकमेव असा संघ आहे ज्यांनी तब्बल ६ वेळा सेमीपर्यंत मजल मारली आहे.
पहिली सेमीफायनल- दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड
- सामन्याची तारीख- ४ मार्च, २०२६
- सामन्याचे ठिकाण- ईडन गार्डन्स कोलकाता
- सामन्याची वेळ- सायंकाळी ७ वाजता
दुसरी सेमीफायल- भारत विरुद्ध इंग्लंड
- सामन्याची तारीख- ५ मार्च २०२६
- सामन्याचे ठिकाण- वानखेडे स्टेडियम, मुंबई
- सामन्याची वेळ- सायंकाळी ७ वाजता.
Web Summary : India secured a semi-final spot in the T20 World Cup 2026, joining South Africa, England, and New Zealand. India will face England in Mumbai on March 5th, while South Africa plays New Zealand in Kolkata on March 4th.
Web Summary : भारत ने टी20 विश्व कप 2026 के सेमीफाइनल में जगह बनाई, दक्षिण अफ्रीका, इंग्लैंड और न्यूजीलैंड के साथ। भारत 5 मार्च को मुंबई में इंग्लैंड से खेलेगा, जबकि दक्षिण अफ्रीका 4 मार्च को कोलकाता में न्यूजीलैंड से भिड़ेगा।