Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pathum Nissanka: पथुम निसांकाचा सामना बदलणारा झेल; स्वत: मॅक्सवेलही झाला शॉक, पाहा व्हिडीओ!

Pathum Nissanka Flying Catch: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेच्या पथुम निसांकाने घेतलेल्या अप्रतिम झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:01 IST

Open in App

आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या रणांगणात गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. या सामन्यात श्रीलंकेच्या पथुम निसांकाने फिल्डिंगचा एक असा नमुना सादर केला, ज्याची तुलना क्रिकेटमधील सर्वोत्तम झेलांशी केली जात आहे. त्याच्या या चित्तथरारक झेलमुळे ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला अवघ्या काही सेकंदात मैदाबाहेर जावे लागले.

ऑस्ट्रेलियाच्या डावातील १७ व्या षटकात श्रीलंकेडून फिरकीपटू दुशन हेमंता गोलंदाजी करत होता.  या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने ऑफ स्टंपच्या बाहेर पडलेल्या फुल लेंथ चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारला. हा चेंडू सीमारेषेवर जाऊनच थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र, बॅकवर्ड पॉईंटवर तैनात असलेल्या पथुम निसांकाने आपल्या उत्कृष्ट फिल्डिंगने त्याचे गणित बदलून टाकले. चेंडू वेगाने जात असताना निस्सांकाने आपल्या डाव्या बाजूला हवेत लांब उडी मारली आणि झेल पकडला. स्वत: मॅक्सवेललाही काही क्षण काय घडले हे उमजले नाही. 

निस्सांकाच्या या अफलातून फिल्डिंगनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक दिग्गजांनी याला विश्वचषकातील सर्वोत्तम झेल म्हणून संबोधले आहे. या एका विकेटमुळे ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला ब्रेक लागला आणि सामन्याचे चित्र पालटले.

ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सने पराभव

या सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत टी-२० विश्वचषकातील आपली विजयी घौडदौड सुरूच ठेवली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकांत सर्व बाद १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेने १८ षटकांतच लक्ष्य गाठून आठ विकेट्सने विजय मिळवला. श्रीलंकेचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pathum Nissanka's stunning catch stuns Maxwell; changes game in T20 World Cup.

Web Summary : Pathum Nissanka's exceptional catch dismissed Glenn Maxwell in the T20 World Cup match between Australia and Sri Lanka. This game-changing moment helped Sri Lanka restrict Australia's score and secure an eight-wicket victory, continuing their winning streak in the tournament.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६आॅस्ट्रेलियाश्रीलंका