Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup: पाकिस्तानचा साहिबजादा फरहान विराट कोहलीला विक्रम मोडणार? एवढ्या धावांनी गरज

Sahibzada Farhan Virat Kohli, T20 World Cup 2026: यंदाच्या विश्वचषकात सध्या साहिबजादा फरहान सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:30 IST

Open in App

Sahibzada Farhan Virat Kohli T20 Records, IND vs PAK T20 World Cup 2026: पाकिस्तान क्रिकेच संघाचा सलामीवीर साहिबजादा फरहान यंदाच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. बुधवारी त्याने नामिबिया विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात ५८ चेंडूत ११ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. साहिबजादा फरहानच्या या दमदार खेळीमुळे पाकिस्तानने सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले. याचाच अर्थ आता पाकिस्तान या स्पर्धेत आणखी किमान तीन सामने खेळेल. या काळात, साहिबजादा फरहानला विराट कोहलीचा एक विश्वविक्रम मोडण्याची संधी आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

विराट कोहलीचा विश्वविक्रम धोक्यात

यंदाच्या टी२० विश्वचषकात चार सामने खेळलेल्या फरहानने आतापर्यंत एकूण २२० धावा केल्या आहेत. यामध्ये एक शानदार शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. टी२० विश्वचषकात पाकिस्तानी फलंदाजाचे हे दुसरे शतक आहे. आधी अहमद शहजादने २०१४ मध्ये बांगलादेश विरुद्ध शतक ठोकले होते. साहिबजादा फरहान सध्या या आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. इतर कोणत्याही फलंदाजाने २०० धावांचा टप्पा गाठलेला नाही. त्यामुळे तो टी२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे.

विराट कोहलीचा विक्रम काय?

टी२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या विराट कोहलीच्या नावावर आहे. २०१४च्या आवृत्तीत विराटने सर्वाधिक ३१९ धावा केल्या. फरहान आता या यादीत कोहलीला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. हा विक्रम मोडण्यासाठी साहिबजादा फरहानला १०० धावांची आवश्यकता आहे. जर फरहानने सुपर ८ मध्ये त्याची चांगली कामगिरी सुरू ठेवली, तर तो केवळ कोहलीला मागे टाकू शकतो.

सुपर-८ मध्ये पाकिस्तानचा सामना कुणाशी?

पाकिस्तानचा संघ सुपर ८ मध्ये पोहोचला असून तिथे फरहानला श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड या तीन संघांविरुद्ध सामने खेळण्याची संधी मिळेल. जर साहिबजादा फरहानने दोन मोठ्या खेळी खेळल्या, तर तो विराट कोहलीला सहज मागे टाकू शकतो. यादरम्यान, टी२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत ३००+ धावा करणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर यादीत तिलकरत्ने दिलशान, बाबर आझम आणि महेला जयवर्धने यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : T20 World Cup: Can Sahibzada Farhan break Virat Kohli's record?

Web Summary : Pakistan's Sahibzada Farhan is in excellent form at the T20 World Cup. With 220 runs already, including a century, he has a chance to surpass Virat Kohli's record of 319 runs in a single tournament. He needs 100 runs to break the record.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीभारत विरुद्ध पाकिस्तान