T20 World Cup 2026 India and Pakistan : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियवर रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ स्टेडियमवर पोहचले. दोन्ही संघ कडेकोट बंदोबस्तात स्टेडियमवर पोहचले. या सामन्याची जगभरात कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. दोन्ही संघातील चाहत्यांनी स्टेडियवर केलेला माहोलही खास होता.
कमालीची क्रेझ, कुलदीपचा चिमुकल्यानं वेधलं लक्ष
स्टेडियम परिसरात कुलदीपच्या चिमुकल्या चाहत्याचीही खास झलक पाहायला मिळाली. पहिल्या दोन सामन्याला बाकावर बसवण्यात आलेला कुलदीप पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूंच दर्शन नाही झाल, कारण...
भारतीय संघातील खेळाडूंची झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. एका बाजूला पाकिस्तानी खेळाडूंची बसमधील झलक पाहायला मिळाली. पण टीम इंडियातील एकाही खेळाडूच दर्शन झालं नाही. कारण भारतीय संघाची बस आणि पाकिस्तानी संघाची बस ही दिसायला अगदी सेम टू सेम असली तरी भारतीय संघ ज्या बसमधून आला त्या बसच्या काचा काळ्या रंगाच्या फिल्मिंगसह कव्हर केल्या होत्या. टीम इंडियातील खेळाडूंची झलक दिसली नाही तर चाहत्यांचा उत्साह अजिबात कमी झाला नाही. काही चाहत्यांनी तिरंगा फडकवत भारतीय संघातील खेळाडूंचे स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.
Web Summary : T20 World Cup 2026: India and Pakistan arrived at the stadium in Colombo for their highly anticipated match. Fans eagerly awaited a glimpse of the Indian players, but the tinted windows of their bus kept them hidden, unlike the Pakistani team.
Web Summary : टी20 विश्व कप 2026: भारत और पाकिस्तान कोलंबो में बहुप्रतीक्षित मैच के लिए स्टेडियम पहुंचे। प्रशंसकों को भारतीय खिलाड़ियों की झलक का बेसब्री से इंतजार था, लेकिन उनकी बस की टिंटेड खिड़कियों ने उन्हें छिपा रखा, पाकिस्तानी टीम के विपरीत।