Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 : साखळी फेरीतील ४० सामन्यांसाठी २४ पंच! भारत-पाक सामन्यात कोण पाहणार जबाबदारी?

साखळी फेरीतील लढतींसाठी २४ पंचांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 21:15 IST

Open in App

T20 World Cup 2026 ICC Announced Match Official  : भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली टी २० वर्ल्ड कप स्पर्धेच्या १० व्या हंगामाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील लढतीनं यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेचा बिगूल वाजणार आहे. आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून या स्पर्धेसाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या पॅनची अधिकृत घोषणा केली आहे. पाकिस्तान आणि नेदरलंड्सच्या यांच्यातील सलामीच्या लढतीत श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि न्यूझीलंडचे वेन नाइट्स हे मैदानातील पंचगिरी करताना दिसतील. याच दिवशी  भारतीय संघ आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. या लढतीत पॉल रीफेल आणि रॉड टकर हे मैदानी पंच म्हणून काम पाहणार आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

साखळी फेरीतील लढतींसाठी २४ पंचांची नियुक्ती

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीत ७ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान एकूण ४० सामने खेळवले जाणार आहेत. .ा सामन्यांदरम्यान एकूण २४ पंच मैदानावर काम पाहणार आहेत. यामध्ये भारताचे जयरामन मदनगोपाल, नितीन मेनन आणि केएनए पद्मनाभन यांचाही समावेश आहे.  सुपर-८ तसेच सेमीफायनल आणि फायनलसाठी पंचांची घोषणा नंतर करण्यात येईल.

टी-२० वर्ल्ड कपसाठी अमेरिकेच्या संघाची घोषणा; कॅप्टनचं गुजरात कनेक्शन अन् सॉफ्टवेअर इंजिनिअरला संधी

भारत-पाकिस्तान सामन्यात धर्मसेना आणि इलिंगवर्थ

१५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना नियोजितआहे. या सामन्यासाठी इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि श्रीलंकेचे कुमार धर्मसेना हे मैदानातील पंचाची जबाबदारी पार पाडताना दिसतील. ५४ वर्षीय कुमार धर्मसेना हे १९९६ च्या विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघाचे सदस्य होते. त्यांनी आतापर्यंत ९३ कसोटी, १३८ वनडे आणि ४७ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली आहे. ६२ वर्षीय रिचर्ड इलिंगवर्थ यांनी ८२ कसोटी, १०६ वनडे आणि ३५ टी २० सामन्यांत पंच म्हणून काम पाहिले आहे. ते इंग्लंडकडून कसोटी आणि वनडे क्रिकेटही खेळले आहेत.

साखळी फेरीतील सामन्यासाठी या पंचाची करण्यात आली आहे नियुक्ती

रोलँड ब्लॅक, क्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, क्रिस गॅफनी, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, वेन नाइट्स, डोनोवन कोच, जयरामन मदनगोपाल, नितीन मेनन, सॅम नोगाजस्की, केएनए पद्मनाभन, अल्लाहुद्दीन पालेकर, अहसान रजा, लेस्ली रीफर, पॉल रीफेल, लँग्टन रुसेरे, शरफुद्दौला इब्ने शाहिद, गाझी सोहेल, रॉड टकर, अ‍ॅलेक्स वॉर्फ, रविंद्र विमलसिरी आणि आसिफ याकूब.

English
हिंदी सारांश
Web Title : T20 World Cup 2026: Umpires announced, India-Pakistan match officials revealed.

Web Summary : ICC announces umpires for T20 World Cup 2026, co-hosted by India and Sri Lanka. Kumar Dharmasena and Richard Illingworth will officiate the high-voltage India-Pakistan clash. The tournament starts on February 7 with Pakistan versus Netherlands. Three Indian umpires are included for the league stage.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2026भारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसीबीसीसीआय