Harshit Rana Ruled Out Team India T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६च्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला दुखापतीचा मोठा फटका बसला आहे. भारताचा युवा आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा सराव सत्रादरम्यान जखमी झाल्यामुळे या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी भारतीय निवड समितीने (BCCI) अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची निवड केली असून, सिराज तातडीने श्रीलंकेत भारतीय संघात सामील होणार आहे.
हर्षित राणाची दुखापत आणि निवड समितीचा निर्णय
हर्षित राणाने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विश्वचषकाच्या १५ सदस्यीय संघात स्थान मिळवले होते. मात्र, कोलंबो येथे झालेल्या सराव सत्रादरम्यान त्याच्या पाठीच्या खालच्या भागात (Lower Back) तीव्र वेदना जाणवू लागल्या. वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर त्याला किमान ४ ते ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयने आयसीसीच्या तांत्रिक समितीकडे बदल करण्याची विनंती केली होती, जिला मंजुरी मिळाली आहे.
मोहम्मद सिराजचे पुनरागमन
सिराजला सुरुवातीला मुख्य संघात स्थान मिळाले नव्हते, परंतु हर्षितच्या दुखापतीमुळे त्याचे नशीब उजळले आहे. सिराजकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव असून, श्रीलंकेतील खेळपट्ट्यांवर त्याची कामगिरी नेहमीच प्रभावी राहिली आहे. विशेषतः आशिया चषकात श्रीलंकेविरुद्ध त्याने केलेली ऐतिहासिक गोलंदाजी सर्वांच्या लक्षात आहे. त्याची अचूक लाईन-लेन्थ आणि नवीन चेंडू स्विंग करण्याची क्षमता भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकते.
भारतीय संघाचे आव्हान
भारतीय संघ आपल्या विश्वचषकातील मोहिमेची सुरुवात ७ फेब्रुवारीला अमेरिकेविरूद्ध करणार आहे. अशा वेळी हर्षित राणा चांगला खेळाडू संघाबाहेर जाणे चिंतेची बाब आहे. सिराजच्या अनुभवामुळे जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना गोलंदाजीच चांगली साथ मिळेल. पण हर्षित राणा फलंदाजीतही योगदान देत होता. त्याबाबत आता संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागेल.
Web Summary : Team India faces setback as Harshit Rana is out of T20 World Cup 2026 due to injury. Mohammed Siraj replaces him, bringing experience to the squad before their opening match against USA.
Web Summary : चोट के कारण हर्षित राणा टी20 विश्व कप 2026 से बाहर हो गए हैं। उनकी जगह मोहम्मद सिराज को टीम में शामिल किया गया है, जो संयुक्त राज्य अमेरिका के खिलाफ शुरुआती मैच से पहले टीम में अनुभव लाएंगे।