T20 World Cup 2026: गर्वाचे घर खाली.. ऑस्ट्रेलियाचं 'पॅक-अप', कॅप्टनाचा जुना फोटो VIRAL

Australia Cricket downfall, T20 World Cup 2026: जुन्या फोटोचा संबंध आताच्या खराब कामगिरीशी लावण्यात येतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:54 IST2026-02-18T12:51:55+5:302026-02-18T12:54:13+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20 World Cup 2026 australia captain mitchell marsh old photo viral disrespecting world cup trophy after shocking exit zimbabwe beat aus | T20 World Cup 2026: गर्वाचे घर खाली.. ऑस्ट्रेलियाचं 'पॅक-अप', कॅप्टनाचा जुना फोटो VIRAL

T20 World Cup 2026: गर्वाचे घर खाली.. ऑस्ट्रेलियाचं 'पॅक-अप', कॅप्टनाचा जुना फोटो VIRAL

Australia Cricket downfall, T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ हा जगातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. परंतु २०२६च्या टी२० विश्वचषकात संघाची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. साखळी फेरीतच त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीत बाहेर पडावे लागण्याची ही दुसरी वेळ ठरली. मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खूपच सुमार झाली. श्रीलंका आणि झिम्बाब्वे यासारख्या तुलनेने कमकुवत संघांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शचा जुना फोटो नव्याने व्हायरल झाला आहे, ज्याचा संबंध ऑस्ट्रेलियाच्या खराब कामगिरीशी लावला जात आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर अंतिम सामन्यानंतरच्या सेलिब्रेशन दरम्यान, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिशेल मार्शने विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. अनेकांनी हा फोटो पाहून नाराजी व्यक्त केली होती. एखाद्या गोष्टीवर पाय ठेवणे किंवा पाय लावणे हे अनादरपूर्ण मानले जाते. विशेषतः भारतीय चाहत्यांनी या कृतीला 'गर्वाचे घर खाली' म्हटले होते. तसेच या घटनेनंतर, ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी घसरू लागली असाही इतिहास दाखवून दिला जात आहे.

२०२३ च्या विश्वचषक विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी

  • २०२४च्या टी२० विश्वचषकात सुपर ८ मध्येच बाहेर
  • टी२० विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच पराभव
  • २७ वर्षांनी घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना पराभूत
  • २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताकडून पराभूत
  • २०२५च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभव
  • पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग तीन वनडे मालिका गमावल्या
  • भारताविरुद्ध घरच्या मैदानावर आणि परदेशात दोन्ही ठिकाणी टी२० मालिका गमावली
  • पाकिस्तान विरुद्धच्या टी२० मालिकेत व्हाईटवॉश
  • २०२६च्या टी२० विश्वचषकात झिम्बाब्वेकडून पराभव
  • १३ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेत श्रीलंकेकडून पराभव
  • २०२६ च्या टी२० विश्वचषकाच्या साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर
  • २००९ नंतर पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या गट टप्प्यात स्पर्धेबाहेर

Web Title : टी20 विश्व कप 2026: ऑस्ट्रेलिया का पतन; कप्तान की पुरानी फोटो वायरल।

Web Summary : ऑस्ट्रेलिया के टी20 विश्व कप से बाहर होने पर आक्रोश। खराब प्रदर्शन और कप्तान मिशेल मार्श की विश्व कप ट्रॉफी के साथ पुरानी फोटो फिर से सामने आई। 2023 विश्व कप जीत के बाद, ऑस्ट्रेलिया को जिम्बाब्वे और श्रीलंका से हार सहित कई हार का सामना करना पड़ा, जिससे जल्दी बाहर होना पड़ा।

Web Title : T20 World Cup 2026: Australia's downfall; captain's old photo goes viral.

Web Summary : Australia's T20 World Cup exit sparks outrage. Poor performance and captain Mitchell Marsh's old photo with the World Cup trophy resurface. After the 2023 World Cup win, Australia has faced numerous defeats, including losses to Zimbabwe and Sri Lanka, leading to early elimination.