T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी

T20 World Cup, AUSW vs SLW, 5th Match : श्रीलंकेचा पराभव करुन ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 19:20 IST2024-10-05T19:06:50+5:302024-10-05T19:20:02+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20 World Cup 2024 sri lanka vs Australia Defending Champions Australia start their title defense with a win | T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी

T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी

AUSW vs SLW । शारजाह : महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख असलेल्या ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व कायम आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा दारुण पराभव केला. यासह श्रीलंकेने या स्पर्धेत सलग दुसरा पराभव स्वीकारला. या आधी पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव करुन विजयी सलामी दिली. आता उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी श्रीलंकेला मोठा संघर्ष करावा लागेल. याशिवाय इतरही संघावर अवलंबून राहावे लागेल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित २० षटकांत ७ बाद अवघ्या ९३ धावा केल्या. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. (ICC Womens T20 World Cup 2024)

श्रीलंकेने दिलेल्या सोप्या आव्हानाचा सहज पाठलाग करुन ऑस्ट्रेलियाने विजय साकारला. कांगारुंनी १४.२ षटकांत ४ बाद ९४ धावा करुन सामना आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनीने सर्वाधिक नाबाद ४३ धावा कुटल्या. लिसा हिलीच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पुरुष संघातील वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क उपस्थित होता. खरे तर स्टार्कची पत्नी हिली ही ऑस्ट्रेलियाच्या संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. 

दरम्यान, सलग दुसऱ्या पराभवामुळे श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची कमान ॲलिसा हिलीच्या हाती आहे, तर श्रीलंकेचे नेतृत्व चमारी अथापथूकडे आहे. श्रीलंकेची कर्णधार चामारी अथापथूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि दोन्ही सलामीवीर अवघ्या सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. श्रीलंकेचा संघ निर्धारित २० षटकांत सात विकेट गमावून केवळ ९३ धावा करू शकला. श्रीलंकेसाठी नीलाक्षी डी सिल्वाने सर्वाधिक २९ धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून मेगन स्कटने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर सोफी मोलिनेक्स (२) आणि एश गार्डनरने (१) बळी घेतला.

Web Title: T20 World Cup 2024 sri lanka vs Australia Defending Champions Australia start their title defense with a win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.