Join us

T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

 Jay Shah On T20 World Cup 2024 : २ जूनपासून ट्वेंटी-२० विश्वचषकाला सुरुवात होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 14:02 IST

Open in App

T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषकाला सुरुवात होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. भारतीय संघाचे खेळाडू अद्याप आयपीएलमध्ये व्यग्र आहेत. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाचे शिलेदार राष्ट्रीय कर्तव्यावर परतत आहेत. खरे तर आयपीएलच्या प्ले ऑफच्या सामन्यांमध्ये अनेक बडे चेहरे नसणार आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या यांची मुंबई इंडियन्स आधीच स्पर्धेबाहेर झाली आहे. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी आगामी विश्वचषकाबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. (Jay Shah News) 

जय शाह यांनी विश्वचषकात कोणते चार संघ उपांत्य फेरी गाठतील याबद्दल भाष्य केले आहे. बीसीसीआय सचिवांच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघ विश्वचषकाची उपांत्य फेरी नक्कीच खेळेल. जय शाह यांनी सांगितले की, भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यजमान वेस्ट इंडिज हे चार संघ उपांत्य फेरी गाठू शकतात. वेस्ट इंडिजने दोनवेळा किताब जिंकला आहे, तर ऑस्ट्रेलिया २०२१ मध्ये चॅम्पियन झाली होती. मात्र न्यूझीलंडच्या खात्यात अद्याप भोपळा आहे. जय शाह 'नवभारत टाइम्स' या वृत्तसंस्थेशी बोलत होते. 

२ जूनपासून थरार भारतीय संघ २०२३ च्या विश्वचषकात स्पर्धेचा प्रबळ दावेदार होता. पण, सलग दहा सामने जिंकून अंतिम फेरी गाठणाऱ्या भारताला बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाकडून यजमान संघाचा पराभव झाला. टीम इंडियाने सलग १० सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती, पण रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाला पॅट कमिन्सच्या संघावर विजय नोंदवता आला नाही. अशाप्रकारे २०११ नंतर भारताचे जगज्जेते होण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरेच राहिले.

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

टॅग्स :जय शाहट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ