AFG vs BAN : राशिदचा 'चौकार'! ऑस्ट्रेलिया हद्दपार; अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये, बांगलादेश चीतपट

AFG vs BAN Live : अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेला सामना प्रेक्षणीय ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 10:19 AM2024-06-25T10:19:04+5:302024-06-25T10:38:40+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024, AFG vs BAN Live Match Updates Afghanistan beat Bangladesh to enter semi-finals, Rashid Khan takes 4 wickets to keep Australia out of the tournament | AFG vs BAN : राशिदचा 'चौकार'! ऑस्ट्रेलिया हद्दपार; अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये, बांगलादेश चीतपट

AFG vs BAN : राशिदचा 'चौकार'! ऑस्ट्रेलिया हद्दपार; अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये, बांगलादेश चीतपट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024, AFG vs BAN Live Match Updates : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ मधील अखेरचा सामना नाना कारणांनी खास ठरला. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या या सामन्यावर ऑस्ट्रेलियन संघाचे भवितव्य अवलंबून होते. कारण दोन्हीही संघांसाठी उपांत्य फेरीत जाण्याची संधी होती. याशिवाय अफगाणिस्तानच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग मोकळा होणार होता. पण, पावसाची बॅटिंग अन् साऱ्यांचीच धाकधुक वाढली. अखेर अफगाणिस्तानने ८ धावांनी सामना जिंकून प्रथमच उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले.

अफगाणिस्तानचा डाव संपल्यानंतर पावसाने हजेरी लावली होती. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. सुदैवाने षटके कमी गेली नाहीत. ११६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ५ षटकांपर्यंत बांगलादेशने ३ गडी गमावून ४३ धावा केल्या होत्या. तेव्हा त्यांना उपांत्य फेरीत जाण्यासाठी ७ षटकांत ७३ धावा करायच्या होत्या. पण, राशिद खान अन् त्याचा संघ कडवी झुंज देत होता. बांगलादेशला केवळ विजय मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागला नसता. पण त्यांना उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी ३.१ षटकांत ४० धावांची गरज होती. कारण १२.१ षटकांत मिळवलेला विजय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. तितक्यात राशिद खानचे वादळ आले आणि बांगलादेशची पळता भुई थोडी झाली. 

राशिद खानने चार बळी घेऊन सामन्यात रंगत आणली. पण, बांगलादेशच्या डावाच्या ११.४ षटकांत पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. तेव्हा त्यांची धावसंख्या ७ बाद ८१ अशी होती. त्यामुळे बांगलादेशला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी ३ चेंडूत ३५ धावांची गरज होती. केवळ औपचारिकता राहिल्याने बांगलादेशचे खेळाडू खचल्याचे दिसले. मात्र, अफगाणिस्तानसाठी विजय खूप महत्त्वाचा होता. बांगलादेशच्या विजयाने त्यांचा काही फायदा होणार नव्हता. बांगलादेशने सामना जिंकला असता तर ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठली असती. या घडीला अफगाणिस्तानचा संघ लुईस डकवर्थ नियमानुसार २ धावांनी पुढे होता. अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या या सामन्यात सातत्याने पावसाने बॅटिंग केली.

पाऊस थांबल्यानंतर एक षटक कमी करण्यात आले. बांगलादेशला आता १९ षटकांत ११४ धावांचे लक्ष्य होते. यामध्ये बांगलादेशने सात गडी गमावून ८२ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना ४२ चेंडूत ३२ धावा हव्या आहेत. मग लिटन दास आणि तन्जीम हसन साकिब यांनी मोर्चा सांभाळला मात्र, बांगलादेशने पात्र होण्याची संधी गमावली होती त्यामुळे अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला. 

अफगाणिस्तान पास ऑस्ट्रेलिया नापास

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने ४ षटकांत अवघ्या २३ धावा देऊन ४ बळी  घेतले. त्याच्या या अप्रतिम स्पेलमुळे अफगाणिस्तानच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. तर बांगलादेशकडून सलामीवीर लिटन दास अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. बांगलादेशला अखेरच्या ८ चेंडूत विजयासाठी १० धावांची गरज होती. तितक्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन होता. यावेळी देखील सलामीला आलेला लिटन दास शेवटच्या फलंदाजासोबत खेळपट्टीवर टिकून होता. पण, तो सामना संपला तरी नाबाद (नाबाद ५४ धावा) तंबूत परतला मात्र बांगलादेशला विजय मिळवला आला नाही. ते १७.५ षटकांत १०५ धावांवर सर्वबाद झाले अन् सामना ८ धावांनी गमावला. या विजयासह अफगाणिस्तानने प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला, तर ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. 

तत्पुर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, बांगलादेशच्या घातक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानसमोर संथ खेळीशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. त्यांनी निर्धारित २० षटकांत ५ बाद ११५ धावा करून बांगलादेशला विजयासाठी ११६ धावांचे लक्ष्य दिले. अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाजने सर्वाधिक खेळी केली, त्याने १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५५ चेंडूत ४३ धावांची संयमी खेळी केली. त्याच्याशिवाय कर्णधार राशिद खानने १० चेंडूत १९ धावांची नाबाद खेळी केली. मात्र, बांगलादेशचा डाव सुरू होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावली अन् खेळ थांबवावा लागला. खरे तर अफगाणिस्तानने दिलेल्या ११६ धावांचे लक्ष्य बांगलादेशने १२.१ षटकांत गाठले असते तर त्यांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले असते. 

बांगलादेशचा संघ -
नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), लिटन दास, तन्जीद हसन, तौहीद हृदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्लाह, सौम्य सरकार, रिशाद हुसैन, तस्कीन अहमद, तन्जीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान. 

अफगाणिस्तानचा संघ - 
राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, गुलाबदीन नायब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, करीम जनत, नांगेयालिया खारोटे, नूर अहमद, नवीन-उलल-हक, फझलहक फारूकी.

Web Title: T20 World Cup 2024, AFG vs BAN Live Match Updates Afghanistan beat Bangladesh to enter semi-finals, Rashid Khan takes 4 wickets to keep Australia out of the tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.