Join us

T20 World Cup Rules: टी-२० वर्ल्ड कप सामन्यात पाऊस आला किंवा टाय झाला तर काय? पाहा ICC चा नियम

T20 World Cup Rules: ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली असून पुढील दीड महिन्यात चाहत्यांना जबरदस्त क्रिकेट सामने पाहायला मिळणार आहेत. आयसीसीने या स्पर्धेसाठी अनेक नियम केले आहेत. पाहूया काय आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 15:58 IST

Open in App

T20 World Cup Rules: ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना 16 ऑक्टोबर रोजी श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात नामिबियानं श्रीलंकेचा पराभव केला. यासह टी-20 विश्वचषक ट्रॉफीसाठी 16 संघांमध्ये क्रिकेट युद्ध सुरू झाले आहे. आता या वेळी कोण चॅम्पियन होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या स्पर्धेला सुरुवात झाली असून, त्यासंबंधीचे नियमही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

विश्वचषकाच्या सामन्यात पाऊस पडला किंवा सामना टाय झाला तर काय होते? आयसीसीने स्पर्धेसाठी वेगवेगळे नियम केले आहेत, त्यानुसार गोष्टी पुढे जातील. पहिल्या पात्रता फेरीत आणि नंतर सुपर-12 टप्प्यातील पॉइंट सिस्टमनुसार संघ या स्पर्धेत पुढे जातील.

काय म्हणतो नियम?पॉइंट सिस्टमनुसार, स्पर्धेतील एका सामन्यातील विजयाला 2 गुण मिळतील, तर पराभवाला शून्य गुण मिळतील. जर सामना टाय झाला, रद्द झाला किंवा सामन्याचा निकाल लागला नाही, तर दोन्ही संघांमध्ये 1 गुण विभागला जाईल. पात्रता आणि सुपर-12 फेरीसाठी कोणताही राखीव दिवस नाही, म्हणजे सामना रद्द झाल्यास तो रद्द मानला जाईल.

कोणत्या सामन्यांसाठी राखीव दिवस

आयसीसीने केवळ प्लेऑफ सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवले आहेत. म्हणजेच सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी राखीव दिवस असतो. या सामन्यांच्या दिवशी पाऊस पडल्यास किंवा अन्य कारणांमुळे सामना न झाल्यास सामना राखीव दिवशी होणार आहे. मात्र, षटके कमी करावी लागली तरी सामना त्याच दिवशी पूर्ण करण्याचा पहिला प्रयत्न असेल.

परिस्थितीनुसार पाच षटकेही टाकण्याची परिस्थिती नसेल तर राखीव दिवस वापरला जाईल. जर सामना वेळेवर सुरू झाला आणि मध्येच पाऊस आला, तसंच सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही, तर राखीव दिवशी सामना जिथे थांबला तिथून पुढे खेळवला जाईल.

टॅग्स :आयसीसीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App