Join us

T20 World Cup 2022: सीडनीत टीम इंडियाला चांगले जेवण मिळेना! मेन्यूवरून खेळाडू नाराज, माघारी पाठविले 

सिडनीतील सराव सत्रानंतर दिलेले अन्न थंड होते आणि चांगले नव्हते, अशी तक्रार आयसीसीकडे करण्यात आल्याचे बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 08:19 IST

Open in App

मेलबर्नमध्ये पाकिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावणाऱ्या भारतीय संघाला सीडनीत चांगले जेवण दिले गेले नसल्याचा प्रकार घडला आहे. मंगळवारी प्रॅक्टिस संपल्यानंतर जेवणाच्या मेन्यूवरून भारतीय खेळाडू नाराज झाले, त्यांनी ते माघारी पाठविले. याची तक्रार बीसीसीआयने आयसीसीकडे केल्याचे समजते आहे. 

सराव केल्यानंतर जवळपास सर्वच संघांसाठी मेन्यू एकसारखाच असतो. भारतीय संघाने मंगळवारी एक प्रॅक्टिस सेशन केला. या प्रॅक्टिससाठी सर्व वेगवान गोलंदाज आणि त्यांच्यासोबत हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव आणि अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली होती. यानंतर सराव सत्रात भाग घेतलेल्या खेळाडूंना दुपारच्या वेळी प्रॅक्टिस सेशननंतर ठरलेला आहार देण्यात आला. भारतीय संघाला गरम जेवण देण्यात आले नाही, अशी तक्रार बीसीसीआयने केली आहे. 

मेन्यूमध्ये प्रॅक्टिसच्या जेवणासाठी फळे आणि कस्टम सँडविच देण्यात आला होता. दुपारच्या जेवणाची वेळ असल्याने भारतीय खेळाडू परिपूर्ण जेवणाची अपेक्षा ठेवून होते. परंतू, ताटात फळे आणि सँडविच दिसल्याने खेळाडूंचा मूड ऑफ झाला. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा कोणताही बहिष्कार वगैरे नव्हता. काही खेळाडूंनी फळे घेतली. मात्र, प्रत्येकाला दुपारचे जेवण करायचे होते. यामुळे ते हॉटेलला परतले आणि जेवले. 

टीम इंडियाने सराव सत्र केले नाही कारण त्यांना ब्लॅकटाउन (सिडनीच्या उपनगरात) येथे सरावाचे ठिकाण देण्यात आले होते. जे टीम इंडियाच्या हॉटेलपासून ४२ किलोमीटर अंतरावर होते. टीम इंडियाला दिलेले जेवण चांगले नव्हते. त्यांना नुसतेच सँडविच दिले गेले. सिडनीतील सराव सत्रानंतर दिलेले अन्न थंड होते आणि चांगले नव्हते, अशी तक्रार आयसीसीकडे करण्यात आल्याचे बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारतीय क्रिकेट संघ
Open in App