टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीपूर्वी सोशल मीडियावर पाक बिन विरुद्ध मिस्टर बिन ट्रेंडिंगमध्ये आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर पाकचा नकली मिस्टर बिन चर्चेत आला होता. कारण काही वर्षांपूर्वी झिम्बाब्वेमधील एका कार्यक्रमासाठी पाकिस्तानमधील एक इसम खोटा मिस्टर बिन म्हणून गेला होता. त्याचाच राग झिम्बाब्वेच्या चाहत्यांनी विजयानंतर पाकवर काढला. पण झिम्बाव्बेविरुद्धचा पराभव मागे टाकत पाकने अंतिम फेरीत धडक मारली. आता त्यांचा सामना खरा मिस्टर बिनच्या देशाशी म्हणजेच इंग्लंडसोबत आहे. म्हणूनच ट्रोलर्सने या सामन्याला खरा विरुद्ध खोटा मिस्टर बिन असा रंग दिला आहे. मिस्टर बिन म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले रोवन ऍटकिन्सन हे मूळचे इंग्लंडचे आहेत. त्यामुळे आजचा सामना हा खरा मिस्टर बिनच जिंकेल असे नेटकऱ्यांनी बोलणे सुरू केले आहे.