Join us  

T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या सराव सामन्यांच्या वेळापत्रकात झाला मोठा बदल; जाणून घ्या कोणाशी भिडणार

updated schedule of warm-up आयसीसीनं या सराव सामन्यांच्या वेळापत्रकात आज बदल केला आहे. सुपर १२साठी क्वालिफाय झालेल्या ८ संघांमध्ये हे सराव सामने होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 4:44 PM

Open in App

T20 World Cup 2021: आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ( २४ ऑक्टोबर) संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहेत आणि १८ व २० ऑक्टोबरला हे सामने होतील. पण, आयसीसीनं या सराव सामन्यांच्या वेळापत्रकात आज बदल केला आहे. सुपर १२साठी क्वालिफाय झालेल्या ८ संघांमध्ये हे सराव सामने होणार आहेत.

भारतीय संघ आधीच्या वेळापत्रकानुसार इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचा सामना करणार होते, परंतु आता त्यांना ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेचा अनुक्रमे १८ व २० ऑक्टोबरला सामना करावा लागणार आहे. इतकंच नव्हे टीम इंडियाच्या सराव सामन्यांच्या स्थळातही बदल केला गेला आहे. विराट कोहली अँड कंपनी आता दुबईतील आयसीसी अकादमीच्या मैदानावर हे सामने खेळणार आहेत. इंग्लंडचा संघ पाकिस्तान व न्यूझीलंडचा सामना करेल. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतासह अफगाणिस्तानचा, तर पाकिस्तान इंग्लंडसह वेस्ट इंडिजविरुद्ध खेळतील.   

भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर ( TEAM - Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Axar Patel, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohd Shami.) 

भारतीय संघाचे वेळापत्रक२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता३१ ऑक्टोबर -   भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता३ नोव्हेंबर -    भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजताउपांत्य फेरीचे सामने  -१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर अंतिम सामना - १४ नोव्हेंबर

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App