Join us

T20 World Cup 2021: "कोहली एक नंबरचा ड्रामाबाज अन् शास्त्री २४ तास नशेत धुंद, त्यांना फक्त पैसा महत्त्वाचा" 

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध १० विकेटसनं गमावला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 12:41 IST

Open in App

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध १० विकेटसनं गमावला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातर तर भारतानं नांगीच टाकली. भारतीय संघाच्या लाजीरवाण्या पराभवावर माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. आता निराशा मागे सारून भारत आज अफगाणिस्तान विरुद्धच्या लढतीला सामोरं जाणार आहे. भारतीय संघाला आज तरी विजयाचा सूर गवसणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पण त्याआधीच भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीवर केआरकेनं विराट कोहली आणि रवी शास्त्रींवर निशाणा साधला आहे. 

भारताचे मुख्य प्रशिक्षक २४ तास नशेच्या धुंदीत असतात आणि विराट कोहली एक नंबरचा ड्रामेबाज असल्याची खरमरीत टीका केआरकेनं केली आहे. केआरकेनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा पोस्टमार्टम केला आहे. यात भारतीय संघाचा समाचार घेतला आहे. "विराट कोहली एक नंबरचा ड्रामेबाज खेळाडू असून त्याला फक्त पैसे हवे आहेत. वर्ल्डकपची त्याला जिंकावासा वाटत नाही. उलट संघ लवकर स्पर्धेच्या बाहेर जावा आणि मायदेशी परतून काही जाहिरातीकरुन कोट्यवधी कमवावेत अशीच त्याची धारणा आहे", अशी घणाघाती टीका त्यानं केली आहे. 

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री तर २४ तास नशेच्या धुंदीत असतात असा खळबळजनक आरोप त्यानं केला आहे. "रवी शास्त्री २४ तास नशेच्या धुंदीत असतात. त्यांचा चेहरा इतका कमाल आहे की जर एखाद्या लहान मुलानं पाहिलं तर तो चार दिवस रडत राहील", असं केआरके म्हणाला आहे. 

"सामन्याची नाणेफेक जेव्हा न्यूझीलंडनं जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता तेव्हाच कोहलीचे पाय थरथर कापू लागले होते. तेव्हाच त्यानं मान्य केलं होतं की आपण सामना १०० टक्के हरणार आहोत अशीच त्याची देहबोली होती", असं केआरके म्हणाला. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१विराट कोहलीरवी शास्त्रीऑफ द फिल्ड
Open in App