Join us
Daily Top 2Weekly Top 5

टी-२० वर्ल्ड चॅम्पियन शिवम दुबेनं मुंबईत खरेदी केले कोट्यवधीचे २ फ्लॅट; किंमत ऐकून थक्क व्हाल

टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये शिवमने २५ चेंडूत ४३ धावा आणि फायनल सामन्यात केवळ ८ चेंडूत २६ धावा बनवल्या होत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:09 IST

Open in App

मुंबई - टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप २०२६ जिंकल्यानंतर अनेक खेळाडू सातत्याने चर्चेत आहेत. विशेषत: संजू सॅमसन आणि ईशान किशनबाबत विविध चर्चा सुरू आहेत. त्याशिवाय आणखी एक खेळाडू आहे जो त्याच्या वेगळेपणामुळे माध्यमांमध्ये झळकत आहे. हा खेळाडू आहे शिवम दुबे..ज्याने सेमी फायनल आणि फायनल सामन्यात केलेल्या उत्कृष्ट पारीने टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. त्याशिवाय शिवम दुबे फायनलमध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ट्रेनने मुंबईला आल्याचीही बातमी प्रसिद्ध झाली. आता शिवम दुबे याने मुंबईत महागडं घर खरेदी केल्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

दुबेनं घेतलेल्या फ्लॅटची किंमत किती?

सलग दोनदा टी -२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियात महत्त्वाचा हिस्सा असलेला खेळाडू शिवम दुबे याने अलीकडेच मुंबईत कोट्यवधीची संपत्ती खरेदी केली आहे. भारतीय ऑलराऊंडर या खेळाडूने जून २०२५ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध ओशिवरा परिसरात एका निवासी प्रकल्पात २ फ्लॅट खरेदी केलेत. ज्याची एकूण किंमत २७.५० कोटी रुपये आहे. हे दोन्ही फ्लॅट DLH एन्क्लेव्हमध्ये आहेत. 

एका रिपोर्टमधून हा खुलासा झाला आहे. नोंदणी कागदपत्राच्या हवाल्याने त्यात सांगण्यात आले आहे की, हे दोन्ही फ्लॅट एकाच इमारतीत आहेत. एक फ्लॅट १७ व्या तर दुसरा १८ व्या फ्लोअरवर आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ९६०० स्क्वेअर फूट इतके आहे. या फ्लॅट खरेदीसाठी शिवम दुबे याने १.६५ कोटी रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी दिलेत. त्याशिवाय सोसायटीत ३ पार्किंग जागाही शिवमने खरेदी केल्या आहेत.

शिवम किती कमावतो?

शिवम दुबे याच्या कमाईबाबत बोलायचे झाले तर त्याला प्रत्येक टी-२० मॅचसाठी ३ लाख रूपये बीसीसीआयकडून मिळतात. त्याला सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये सी श्रेणीत ठेवले आहे. जिथे वार्षिक १ कोटी कमाई दिली जाते. सध्या शिवम दुबे आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्सचाही खेळाडू आहे. त्याला २०२५ च्या मेगा लिलावात १२ कोटी रुपयांत रिटेन केले होते. त्यानंतर शिवमने मुंबईत फ्लॅट खरेदी केले. 

वर्ल्डकपमध्ये दाखवला जलवा

टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये शिवमने २५ चेंडूत ४३ धावा आणि फायनल सामन्यात केवळ ८ चेंडूत २६ धावा बनवल्या होत्या. टीम इंडियाच्या विजयात शिवमच्या या खेळीचे श्रेय जाते. शिवम दुबे याने २०१९ साली डेब्यू केले होते. मागील ३ वर्षापासून तो सातत्याने टीम इंडियासाठी टी-२० वर्ल्ड फॉर्मेटमध्ये खेळत आहे. याशिवाय IPL सामन्यातही शिवम दुबे याने आपला खेळाचा ठसा उमटवला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : T20 World Champion Shivam Dube Buys Multi-Crore Flats in Mumbai

Web Summary : Shivam Dube, fresh off T20 World Cup success, purchased two flats in Mumbai's Oshiwara for ₹27.5 crore. The flats, located in DLH Enclave, span 9600 sq ft. Dube paid ₹1.65 crore in stamp duty and acquired three parking spaces, adding to his CSK earnings.
टॅग्स :शिवम दुबेआयसीसीट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६