Join us  

T20 WC Final, Aus Vs Nz: ६ वर्षांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियानं इतिहास रचला; मार्शच्या खेळीनं न्यूझीलंडचा गेमच पलटला

अंतिम सामन्याचा ऑस्ट्रेलियानं जिंकला. त्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला १७२ रन्सवर अडवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 11:30 PM

Open in App

T20 WC Final, Aus Vs Nz: जगाला नवीन टी-२० वर्ल्डकपचा चॅम्पियन मिळाला आहे. ऑस्ट्रेलियानं रविवारी खेळलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला मात देऊन टी-२० वर्ल्डकप २०२१ च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच टी-२० क्रिकेट स्पर्धेत पहिला वर्ल्डकप जिंकला आहे. ८ विकेट राखत ऑस्ट्रेलियानं विजय मिळवत इतिहास रचला आहे.

अंतिम सामन्याचा ऑस्ट्रेलियानं जिंकला. त्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला १७२ रन्सवर अडवलं. न्यूझीलंडकडून कॅप्टन केन विलियमसनने सर्वाधिक ८५ धावांची खेळी करत स्वत:च्या टीमसाठी एकतर्फी लढाई लढली. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाची गोलंदाजीवर पकड मजबूत होती. परंतु त्यानंतर केन विलियमसननं संपूर्ण वातावरण बदलून टाकलं आणि न्यूझीलंडने १७२ धावांपर्यंत मजल मारली.

वॉर्नर आणि मार्शनं न्यूझीलंडचा गेमच पलटला

न्यूझीलंडनं १७३ धावांचं टार्गेट दिल्यानंतर ऑस्ट्रेलियानं फलंदाजीत कमाल दाखवली. वर्ल्डकपच्या पूर्वी डेविड वॉर्नरच्या फॉर्मवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु पुन्हा एकदा वॉर्नरनं महत्त्वाच्या सामन्यात दमदार खेळी करत टीकाकारांची बोलती बंद केली. डेविड वॉर्नरनं ५३ धावा केल्या आणि कॅप्टन एरन फिंचची विकेट पडल्यानंतरही टीमला मजबूतपणे सावरलं.

ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा हिरो ठरला मिचेल मार्श. ज्याने फायनलमध्ये तुफानी खेळी करत न्यूझीलंडकडून विजय हिसकावून घेतला. मिचेल मार्शची या वर्ल्डकपची सुरुवात खराब झाली परंतु अखेरच्या मॅचमध्ये त्याने कमाल केली. सातत्याने मार्शनं मोठ्या धावा घेतल्या. मिचेश मार्शनं ५० चेंडूत ७७ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ४ षटकार लगावले. डेविड वॉर्नरसोबत मिळून मिचेल मार्शनं संपूर्ण बाजीच उलटवली.

टी-२० वर्ल्डकपचे आतापर्यंतचे विजेते

२००७ – भारत

२००९ – पाकिस्तान

२०१० – इंग्लंड

२०१२ – वेस्टइंडिज

२०१४ – श्रीलंका

२०१६ – वेस्टइंडिज

२०२१ – ऑस्ट्रेलिया

६ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ट्रॉफी मिळाली

वनडे स्पर्धेत अनेकदा चॅम्पियन राहिलेली ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच टी-२० स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. विशेष  म्हणजे जवळपास ६ वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या हातात आयसीसी ट्रॉफी आली आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियानं वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया सेमीफायनलपर्यंत पोहचली होती. परंतु २०२१ मध्ये टी-२० वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियानं त्यांचे नाव लिहिलं आहे.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१न्यूझीलंडडेव्हिड वॉर्नर
Open in App