Join us

40 ALL OUT! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं

T20 World Cup 2024 : न्यूझीलंडले नवख्या युगाडांच्या संघाला स्वस्तात बाद केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 07:43 IST

Open in App

NZ vs UGA T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या ३२ व्या सामन्यात न्यूझीलंड आणि युगांडा हे संघ भिडले. यांच्या क गटातून वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानने सुपर-८ मध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे हा सामना म्हणजे केवळ औपचारिकता. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात किवी संघाच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

युगांडा संपूर्ण संघ १८.४ षटकांत अवघ्या ४० धावांवर सर्वबाद झाला. युगांडाकडून एकाही फलंदाजाला ११ हून अधिक धावा करता आल्या नाहीत. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना प्रतिस्पर्धी संघाला अर्धशतकी धावसंख्या देखील करून दिली नाही. किवी संघाकडून टीम साऊदीने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर ट्रेन्ट बोल्ट (२), मिचेल सँटनर (२), रचिन रवींद्र (२) आणि लॉकी फर्ग्युसनने (१) बळी घेतला.

दरम्यान, ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधून अधिकृतपणे बाहेर झालेल्या न्यूझीलंडच्या संघाच्या खात्यात अद्याप भोपळा आहे. त्यामुळे युगांडाला नमवून विजयाते खाते उघडण्याचे लक्ष्य न्यूझीलंडसमोर असेल. न्यूझीलंडला आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. 

न्यूझीलंडचा संघ -केन विल्यमसन (कर्णधार), डेव्होन कॉन्वे, फिन अॅलन, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन.

युगांडाचा संघ - ब्रायन मसाबा (कर्णधार), रोनक पटेल, सायमन सेसाजी, रॉबिन्सन ओबुया, रियाजत अली शाह, अल्पेश रामजानी, दिनेश नाकरानी, कॅनेथ वॅसवा, फ्रेड अचेलम, जुमा मियागी, कॉसमास क्युवता.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024न्यूझीलंडकेन विल्यमसन