Join us

T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत

पृथ्वीचा आणखी एक फ्लॉप शो, जो डाव खेळला तोही अयशस्वी ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 11:40 IST

Open in App

T20 Mumbai League 2025 Aakash Tigers MWS VS North Mumbai Panthers : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील नॉर्थ मुंबई पँथर्स संघाला पराभूत करत शम्स मुलानीच्या आकाश आकाश टायगर्स MWS संघाने स्पर्धेतील पहिल्या विजयाची  नोंद केलीये. पावसाच्या व्यत्ययामुळे शनिवारी वानखेडे स्टेडियमवर रंगलेला टी-२० मुंबई लीग स्पर्धेतील १४ वा सामना प्रत्येकी ५-५ षटकांचा खेळवण्यात आला. विशेष म्हणजे धावांचा  पाठलाग करताना पाच षटकांच्या सामन्यात पृथ्वीच्या संघावर पराभवाची नामुष्की ओढावली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

६७ धावांचे टार्गेट

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना आकाश टायगर्स संघाची सुरुवात खराब झाली. की शुरुआत खराब रही। हार्दिकने  ५ चेंडूत केलेल्या १६ धावा आणि बिस्टा (८) शम्सी मुलानी (१२) आणि अर्जुन दानी (१०) यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर  आकाश टायगर्स संघाने ५ षटकांच्या सामन्यात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ६६  धावा करत पृथ्वीच्या संघासमोर ६७ धावांचे टार्गेट सेट केले होते.

T20 Mumbai League : पृथ्वीचं 'ग्रहण' सुटता सुटेना! आता लोकल लीगमध्येही फ्लॉप शो

धावांचा पाठलाग करताना पृथ्वीचा आणखी एक फ्लॉप शो, जोडीदाराला रिटायर्ड आउट करण्याचा प्लानही फसला 

या धावसंख्येचा पाठलाग करताना नॉर्थ मुंबई पँथर्स संघाकडून कर्णधार पृथ्वी शॉ आणि दिग्वेश सक्सेना या सलामी जोडनं डावाची सुरुवात केली. पहिल्या दोन षटकात फक्त १० धावा केल्या. तिसऱ्या षटकानंतर धावफलकावर २४ धावा असताना दिग्वेश सक्सेना रिटायर्ड आउट झाला. पण धावगती वाढवण्यासाठी खेळलेला हा डावही फसला. त्याच्या जागी आलेल्या आयुष वर्तकलाही मोठी फटकेबाजी करणं जमलं नाही. दुसरीकडे कर्णधार पृथ्वी शॉच्या रुबात ३९ धावांवर संघाने दुसरी विकेट गमावली. त्याने १२ चेंडूत १९ धावांची खेळी केली. ज्यात त्याच्या भात्यातून १ चौकार आणि १ षटकार पाहायला मिळाला. पृथ्वी आउट झाल्यावर संघाची विजयाची आसच धूसर झाली. रिटायर्ड आउट झालेल्या सक्सेनाच्या जागी आलेल्या आयुष वर्तक याने ६ चेंडूचा सामना करत एकही चौकार षटकार न मारता नाबाद राहत फक्त ४ धावांचे  केल्या. तर सौरभ सिंग याने एका चौकाराच्या मदतीने २ चेंडूत नाबाद ५ धावांची खेळी केली.

टॅग्स :टी-20 क्रिकेटपृथ्वी शॉ