Join us  

T20 : भारताचे लक्ष्य ‘क्लीन स्वीप’, वेस्ट इंडिजविरुद्ध आज अंतिम लढत

बेंच स्ट्रेंग्थला संधी : विंडीजविरुद्ध अखेरची टी-२० लढत आज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 7:28 AM

Open in App

चेन्नई : वेस्ट इंडिजविरुद्ध आज रविवारी रंगणाऱ्या तिसºया आणि अखेरच्या सामन्यात विजयासह टी-२० मालिकेत ‘क्लीन स्वीप’ करण्याचे लक्ष्य भारताने आखले आहे. या सामन्यात बेंच स्ट्रेंग्थचा प्रयोगदेखील होईल. चेन्नईच्या चाहत्यांना मात्र आपल्या आवडत्या महेंद्रसिंग धोनीची उणीव जाणवेल.

कर्णधार रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने लखनौ येथे २-० अशी विजय आघाडी संपादन केली. यामुळे श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम यांना आॅस्ट्रेलिया दौºयाआधी संधी दिली जाणार आहे. उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देत सिद्धार्थ कौल याला खेळविण्याचा संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला. स्थानिक आकर्षण असलेल्या दिनेश कार्तिकने कमी धावसंख्येच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तो येथेही कमाल करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. वन डेत कडवे आव्हान सादर करणारा विंडीज संघ टी-२० त मात्र सपशेल अपयशी ठरला आहे. भारताच्या सलामी जोडीकडेही सगळ्यांचे लक्ष राहिल. रोहित शर्माचा फॉर्म ही भारताची जमेची बाजू आहे. तर लोकेश राहुल याने देखील मागच्या सामन्यात मोक्याच्या वेळी फटकेबाजी केली. नियमित सलामीवीर ख्रिस गेल आणि एव्हिन लुईस यांच्या अनुपस्थितीत संघाचे संयोजन कमकुवत वाटते. त्यामुळे दौºयाचा शेवट विजयाद्वारे करण्याची अपेक्षा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने व्यक्त केली आहे. कीरोन पोलार्ड, डेरेन ब्राव्हो आणि दिनेश रामदीन यांच्यासारखे अनुभवी दिग्गज अपयशी ठरले तर शेरोन हेटमेयरदेखील लौकिकास्पद कामगिरी करू शकला नाही. गोलंदाजीतही ओशाने थॉमस याला अन्य सहकाºयांची साथ लाभलेली नाही. वेस्ट इंडिज्च्या संघाला अजून आपला टी२० फॉर्म दाखवता आलेला नाही.उभय संघ असेभारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कुणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, शाहबाज नदीम आणि सिद्धार्थ कौल.

वेस्ट इंडिज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), डेरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमेयर, शाय होप, ओबेद मॅकॉय, कीमो पॉल, खेरी पियरे, कीरोन पोलार्ड, निकोलस पूरण, रोवमॅन पॉवेल, दिनेश रामदीन, शेरफेन रदरफोर्ड आणि ओशाने थॉमस.कुलदीपचा मारा समजू शकलो नाही : रामदीनचेन्नई : चायनामॅन कुलदीप यादवचा मारा समजून घेण्यात आलेले अपयश हेच टी-२० मालिकेत पराभवामागील कारण असल्याचे वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश रामदीन याने म्हटले आहे. विंडीज संघ दोन वन डेचा अपवाद वगळता संपूर्ण दौºयात भारतापुढे नतमस्तक झालेला वाटला.कसोटी, वन डे आणि टी-२० अशा तिन्ही मालिकांमध्ये भारताने त्यांंना सहज धूळ चारली.तिन्ही मालिकांमध्ये कुलदीपची गोलंदाजी पाहुण्यांसाठी डोकेदुखी होती.तिसºया आणि अखेरच्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला रामदीन म्हणाला,‘सद्य:स्थितीत संघबांधणी अत्यंत कठीण काम आहे. आमच्या टी-२० खेळाडूंना जगभरात मागणी आहे; पण याचा फटका राष्टÑीय संघाला बसतो.आमचे सिनियर खेळाडू दौºयावर आले नसल्यामुळे संघ पराभवाच्या खाईत सापडला आहे.आक्रमक ख्रिस गेल आणि फिरकीपटू सुनील नारायण हे विंडीज संघातून बाहेर असून, ड्वेन ब्राव्हो याने मागच्या महिन्यात आंतरराष्टÑीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. विंडीजचे फलंदाज कुलदीपचा मारा समजू शकले नाहीत. मधल्या षटकांत कुलदीप आमच्यासाठी मोठे आव्हान ठरला. त्याच्या चेंडूवर धावा घेऊ शकलो नाही. विश्व टी-२० चॅम्पियन असूनही याच प्रकारात आम्ही ढेपाळलो, हे दुर्दैव म्हणावे लागेल.’

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेटरोहित शर्मा